iPhone 11 on Discount: प्रचंड सवलतीत खरेदी करा iPhone 11, ‘येथे’ सुरु आहे ऑफर्सचा वर्षाव
Flipkart वर iPhone 11 अगदी कमी किमतीत खरेदी करता येईल.
HDFC क्रेडिट कार्डसह EMI व्यवहारांवर 1,000 रुपयांची सवलत दिली जाईल.
Apple A13 बायोनिक चिपसेटद्वारे सर्व कामे 6 पट वेगाने करता येतात.
ई-कॉमर्स वेबसाइट्सवर प्रत्येक दिवसाला उपकरणांवर काही ना काही ऑफर ही सुरुच असते. आता Flipkart बद्दल बोलायचे झाले तर, येथून बरेच स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह खरेदी केले जाऊ शकतात. दररोजच तुम्हाला लोकप्रिय स्मार्टफोन्सवर काही ना काही ऑफर्स मिळतील. Apple चा लोकप्रिय iPhone म्हणजेच iPhone 11 अगदी कमी किमतीत खरेदी करता येतो. या फोनवर बँक, EMI आणि इ. ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. बघुयात सविस्तर
iPhone 11 ची किंमत
या फोनचा 64GB स्टोरेज वेरिएंट कमी किमतीत खरेदी करता येईल. त्याची किंमत 43,900 रुपये असली तरी 4% सूट देऊन 41,999 रुपयांना खरेदी करता येईल. या किमतीसह फ्लिपकार्टवर हा लोकप्रिय स्मार्टफोन सूचिबद्ध करण्यात आला आहे. यावर पुढीलप्रमाणे अनेक ऑफर्स उपलब्ध आहे.
बँक ऑफर्स
HDFC क्रेडिट कार्डसह EMI व्यवहारांवर 1,000 रुपयांची सवलत दिली जाईल. HDFC डेबिट कार्डने EMI व्यवहार केल्यास 1,000 रुपयांची सवलत दिली जाईल. Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक दिला जाईल.
एक्सचेंज ऑफर
iPhone 11 प्रचंड स्वस्तात खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे एक्सचेंज ऑफरचा देखील पर्याय आहे. जुन्या फोनच्या एक्सचेंजवर 39,700 रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. मात्र लक्षात घ्या की, संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळवण्यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान फोन उत्तम स्थितीत हवा.
EMI ऑफर
जर तुम्हाला एकाच वेळी पैसे भरायचे नसतील तर तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा 1,436 रुपये द्यावे लागतील. एकाच वेळी खिशाला ताण नसेल द्यायचा तर स्वस्तात सहज फोन खरेदी करण्यासाठी EMI ऑफरचा लाभ घ्या.
iPhone 11
फोनमध्ये 6.1-इंच लांबीचा Liquid Retina HD डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले उच्च कॉन्ट्रास्ट आणि उच्च ब्राइटनेससह अत्यंत डायनॅमिक श्रेणी प्रदान करतो. प्रोमोशन आणि ट्रू टोन डिस्प्ले तंत्रज्ञान प्रतिसादात्मक आणि नैसर्गिक व्यूविंग एक्सपरीयंस देतात. प्रोसेसर म्हणून यात Apple A13 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. यासह, फोनमध्ये सर्वात सामान्य मशीन लर्निंग कार्य पूर्ण केले जाऊ शकतात. यामुळे ही सर्व कामे 6 पट वेगाने करता येतात.
या फोनमध्ये दोन स्टोरेज वेरिएंट देण्यात आले आहेत. पहिला व्हेरिएंट प्रकार 64GB स्टोरेजसह येतो. तर, दुसरा 128GB स्टोरेजसह येतो. फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेंसर आहे, ज्याचा पहिला सेन्सर 12MP आहे. तर, दुसरा 12MP चा आहे. फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे. 12MP कॅमेरा इमेजेस हे कोणत्याही डिस्प्लेवर शार्प दिसण्यासाठी पुरेशा असता. फोनमध्ये 3100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीसह तुम्हाला फोन पॉवर सेव्हर मोडमध्ये चार्जेस दरम्यान 35+ तास ऑपरेट करता येईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile