प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix ने अलीकडेच भारतात आपला फोल्डेबल स्मार्टफोन Infinix Zero Flip 5G भारतात लाँच केला होता. सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर Big Bachat Days Sale सुरू आहे. फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेल 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत चालेल. नवीन स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला अनेक ऑफर्सचा लाभ देखील मिळेल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Infinix Zero Flip 5G फोनवरील ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेउयात Infinix Zero Flip 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: OnePlus 12R Discount: लोकप्रिय स्मार्टफोनवर Amazon देतोय तब्बल 5000 रुपयांची सूट, पहा ऑफर
Flipkart च्या Infinix Zero Flip 5G फोन फक्त 49,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. लक्षात घ्या की, या स्मार्टफोनची मूळ किंमत 79,999 रुपये इतकी आहे. पण, सर्व सवलतींसह तुम्ही हा फोल्डेबल फोन 44,999 रुपयांना खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart निवडक बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 5,000 रुपयांची स्वतंत्र सूट मिळेल. या सवलतीसह तुम्ही हा फोन 44,999 रुपयांना मिळेल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
नवीनतम Infinix Zero Flip हा फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच लांबीचा AMOLED फुल HD+ डिस्प्ले आहे. कव्हर डिस्प्ले म्हणून यात 120Hz रिफ्रेश रेटसह 3.64-इंच लांबीचा AMOLED स्क्रीन देखील आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimension 8020 चिपसेटद्वारे समर्थित असेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेजसह येतो.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Infinix Zero Flip 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP OIS आणि 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा उपलब्ध आहे. फोटोग्राफी करण्यासाठी हे फीचर्स उपयुक्त आहेत. त्याबरोबरच, आकर्षक व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा देखील प्रदान केला आहे. 50MP कॅमेराचा मोठा सेन्सर प्रकाश अधिक चांगल्या प्रकारे इमेज कॅप्चर करू शकतो, परिणामी उजळ आणि अधिक व्हायब्रण्ट फोटो मिळू शकतात. तर, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4720mAh बॅटरी असेल, जी 70W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या समर्थनासह येईल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहे.