जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Infinix ने उत्तम संधी आणली आहे. आम्ही तुम्हाला Infinix च्या नवीन स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. Infinix Smart 6 या स्मार्टफोनवर तुम्हाला प्रचंड सूटही मिळत आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. बघुयात कुठे मिळतेय खास ऑफर…
हे सुद्धा वाचा : REDMI चे दोन बजेट स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, BIS वर सूचीबद्ध
तुम्ही Flipkart वरून Infinix Smart 6 (2GB+64GB) खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची MRP रु.8,999 आहे आणि तुम्ही 27% डिस्काउंटसह Rs.6,499 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. कोटक बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% ची वेगळी सूट मिळू शकते. फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो.
तसेच, तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असल्यास तुम्ही तो फ्लिपकार्टवर एक्सचेंज करून 5,950 रुपयांची सूट मिळवू शकता. सर्व ऑफर लागू झाल्यानंतर तुम्ही हा फोन 550 रुपयांमध्ये स्वतःचा बनवू शकता. यावर कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटीही दिली जात आहे. त्याबरोबरच, आज ऑर्डर केल्यावर हा फोन उद्यापर्यंत तुमच्या घरीही पोहोचवला जाईल.
Infinix Smart 6 ला 6.6 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले मिळतो. तसेच, यामध्ये 8MP+ डेप्थ लेन्सचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000 mAh ली-आयन पॉलिमर बॅटरी उपलब्ध होणार आहे. फोनमध्ये Mediatek Helio A22 प्रोसेसर उपलब्ध आहे. जर तुम्ही कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन शोधत असाल तर तो तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.