Honor X9b 5G फोन त्याच्या मजबूत बॉडीसाठी प्रसिद्ध आहे.
Honor X9b 5G फोन सध्या Amazon वर 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.
Honor X9b 5G फोन एका चार्जवर तब्बल 3 दिवस चालेल.
Honor ने आपल्या लेटेस्ट Honor 90 स्मार्टफोनसह भारतात जबरदस्त कमबॅक केला होता. त्यानंतर, कंपनीने भारतीय बाजारात अप्रतिम स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यामधून एक म्हणजे Honor X9b 5G स्मार्टफोन होय. या स्मार्टफोनची विशेषता म्हणजे Honor X9b 5G फोन त्याच्या मजबूत बॉडीसाठी प्रसिद्ध आहे. हा फोन जोरात आपटल्यावरही फुटणार नाही, असा दावा केला जातो. हा फोन सध्या अप्रतिम डिस्काउंटसह उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात Honor X9b 5G स्मार्टफोनवरील ऑफर्स-
HONOR X9b 5G फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 25,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला. मात्र, हा फोन सध्या Amazon वर 22,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. हा फोन सध्या Amazon वर 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह 22,999 रुपयांना विकला जात आहे. इतकेच नाही तर, ICICI बँक कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांची सूट देखील आहे. येथून खरेदी करा
HONOR X9b 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
HONOR X9b 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 (4nm) प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन Android 13 आधारित MagicOS 7.2 सह येतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, 5MP अल्ट्रा-वाइड सेन्सर समाविष्ट आहे आणि 2MP चा तिसरा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5800mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन एका चार्जवर तब्बल 3 दिवस चालेल, असा कंपनीचा दावा आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.