पडल्यावरही फुटणार नाही! मजबूत बॉडीसह येणाऱ्या Honor X9b 5G वर भारी Discount, Amazon वर आकर्षक ऑफर्स उपलब्ध 

पडल्यावरही फुटणार नाही! मजबूत बॉडीसह येणाऱ्या Honor X9b 5G वर भारी Discount, Amazon वर आकर्षक ऑफर्स उपलब्ध 
HIGHLIGHTS

Honor चा Honor X9b 5G स्मार्टफोन लाँच होताच लोकप्रिय झाला.

Amazon वर GIF सेलदरम्यान Honor X9b 5G अतिशय कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध

Honor X9b 5G एका चार्जवर हा फोन तब्बल तीन दिवस चालेल, असा कंपनीचा दावा आहे.

प्रसिद्ध टेक जायंट Honor चा Honor X9b 5G स्मार्टफोन लाँच होताच लोकप्रिय झाला होता. कितीही वरून पडल्यास हा फोन फुटणार नाही, असा दावा कंपनीने केला. त्यानंतर, अनेक युजर्स आणि प्रकाशकांनी हा फोन आपटून सुद्धा दाखवला होता. अर्थातच हा फोन अत्यंत मजबूत बॉडीसह सादर केला गेला आहे. सध्या Amazon वर लाईव्ह असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलदरम्यान Honor X9b 5G अतिशय कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. यावर आकर्षक ऑफर्स देखील मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Honor X9b 5G वरील डिस्काउंट ऑफर्स-

Honor X9b 5G ची किंमत आणि ऑफर्स

नवीनतम HONOR X9b 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Amazon वर 30,999 रुपये आहे. मात्र, हा फोन Amazon सेल दरम्यान 25,998 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर स्वतंत्र बँक ऑफर्सही मिळणार आहेत. SBI बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 5000 रुपयांची ऑफर मिळणार आहे. Buy From Here

Honor X9b 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

HONOR X9b 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचलांबीचा AMOLED कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. हा फोन Android 13 आधारित MagicOS 7.2 वर कार्य करेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये सिंगल 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहे.

HONOR X9B 5G IN AMAZON GIF SALE   2024

फोटोग्राफीसाठी HONOR X9b 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये तुम्हाला 108MP प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. या सेटअपमध्ये 5MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फीचे शौकीन असलेल्या लोकांसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5800mAh बॅटरी आहे. या बॅटरीसह हा फोन एका चार्जवर हा फोन तब्बल तीन दिवस चालेल, असा कंपनीचा दावा आहे.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo