लेटेस्ट Honor X9B 5G स्मार्टफोनवर मिळतोय 3000 रुपयांचा Discount, बघा अप्रतिम डील। Tech News  

लेटेस्ट Honor X9B 5G स्मार्टफोनवर मिळतोय 3000 रुपयांचा Discount, बघा अप्रतिम डील। Tech News  
HIGHLIGHTS

नवा स्मार्टफोन Honor X9B भारतीय बाजारपेठेत लाँच

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 3000 रुपयांची सूट उपलब्ध

या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे.

Honor ने अलीकडेच आपला नवा स्मार्टफोन Honor X9B भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. जर तुम्हाला देखील हा नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, तुम्हची अगदी योग्य ठिकाणी आहात. लेटेस्ट स्मार्टफोन Honor X9B वर खूप मोठी सूट मिळत आहे. स्मार्टफोनसह तुम्हाला अनेक अप्रतिम स्पेसिफिकेशन्स मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात नव्या स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्ध ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Amazing! तब्बल 100 तासांच्या बॅटरी लाईफसह OnePlus Watch 2 भारतात लाँच, तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवी स्मार्टवॉच? Tech News

Honor X9B ची किंमत आणि ऑफर्स

या Honor स्मार्टफोनची किंमत 25,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. वर सांगितल्याप्रमाणे, फोनवर काही ऑफर्स उपलब्ध आहेत. AMAZON वरील ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, फोनवर 1,260 रुपयांची नो-कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंजसाठी उपलब्ध असेल तर, या फोनवर 22,300 रुपयांची एक्सचेंज ऑफरदेखील दिली जात आहे.

Honor X9b details
Honor X9b details

Honor X9B चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

HONOR X9b मध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे. तसेच, हा फोन Android 14 OS वर कार्य करेल. Honor X9B मध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 108MP प्रायमरी सेन्सर आहे. त्याबरोबरच, 5MP अल्ट्रावाइड आणि 2MP मॅक्रो लेन्स देखील देण्यात आली आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 5800mAh ची बॅटरी आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही बॅटरी 2 ते 3 दिवस टिकते असा कंपनीचा दावा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo