Limited ऑफर! 200MP कॅमेऱ्यासह येणार Honor 90 5G सेलमध्ये मिळतोय तब्बल 6 हजार रुपयांनी स्वस्त। Tech News 

Limited ऑफर! 200MP कॅमेऱ्यासह येणार Honor 90 5G सेलमध्ये मिळतोय तब्बल 6 हजार रुपयांनी स्वस्त। Tech News 
HIGHLIGHTS

कंपनीने आजपासून HONOR Days सेलची घोषणा केली आहे.

हा सेल 5 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

ICICI, SBI आणि HDFC बँक कार्डद्वारे पेमेंटवर 3000 रुपयांची झटपट बँक सवलत

सध्या कंपनीने HONOR Days सेलची घोषणा केली आहे. हा सेल आज म्हणजेच 5 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत सुरु असेल. Honor Days सेल विशेषतः ई-कॉमर्स साइट Amazon वर सुरू राहील. सेलदरम्यान अलीकडेच लाँच केलेल्या Honor 90 5G वर उत्तम ऑफर दिल्या जात आहेत. ग्राहकांना Honor 90 5G वर डिस्काउंट, बँक ऑफर, नो-कॉस्ट EMI यासह उत्तम ऑफरचा लाभ मिळणार आहे. Honor 90 5G वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात-

हे सुद्धा वाचा: Important! WhatsApp वापरण्यासाठी द्यावे लागतील पैसे? कंपनी करतेय मोठे बदल, नेमकं प्रकरण काय? Tech News

Honor 90 5G IN AMAZON SALE

Honor 90 5G वरील ऑफर

  • Honor 90 5G वर 3000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध असेल.
  • कंपनी ICICI, SBI आणि HDFC बँक कार्डद्वारे पेमेंटवर 3000 रुपयांची झटपट बँक सवलत देखील देत आहे.
  • वापरकर्त्यांना जुन्या डिव्हाइसच्या एक्सचेंजवर 5000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते.
  • 12 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI पर्याय सर्व बँक कार्डवर उपलब्ध आहे.

वरील सर्व ऑफर्ससह वापरकर्ते हा स्मार्टफोन केवळ 31,999 रुपयांना खरेदी करू शकतात. मात्र लक्षात घ्या की, एक्सचेंज ऑफरमधील 5000 रुपयांच्या सूटवर अनेक अटी आणि शर्ती लागू होतात. Buy from here

Honor 90 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

honor 90 5g features

Honor 90 5G मध्ये 6.7-इंच लांबीचा क्वाड-कर्व फ्लोटिंग डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर आहे.हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित HONOR MagicOS 7.1 वर चालतो. कंपनी 2 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि 3 वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच अपडेट्सचे आश्वासन देत आहे.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, Honor 90 5G च्या मागील बाजूस 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा-वाइड/मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा आहे. समोर 50MP चा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी, NFC सपोर्ट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि UFS 3.1 समाविष्ट आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo