Best Deal: 200MP मेन कॅमेरासह येणाऱ्या Latest Honor 90 स्मार्टफोनवर 10,000 रुपयांची सूट, बघा ऑफर 

Best Deal: 200MP मेन कॅमेरासह येणाऱ्या Latest Honor 90 स्मार्टफोनवर 10,000 रुपयांची सूट, बघा ऑफर 
HIGHLIGHTS

कंपनीने नवीनतम Honor 90 स्मार्टफोनसह भारतात जबरदस्त पुनरागमन केला.

Amazon वर हा स्मार्टफोन अप्रतिम ऑफर्ससह खरेदीसाठी उपलब्ध आहे.

बँक ऑफ बडोदा कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांची इन्स्टंट डिस्काउंट ऑफर

अलीकडेच Honor ने बऱ्याच कालावधीनंतर नवीनतम Honor 90 स्मार्टफोनसह भारतात जबरदस्त पुनरागमन केला आहे. लाँच होताच या स्मार्टफोनने ग्राहकांकडून बरीच प्रशंसा देखील मिळवली. त्यानंतर, आता या लेटेस्ट स्मार्टफोनवर बंपर सवलत देण्यात येत आहे. होय, Amazon वर हा स्मार्टफोन अप्रतिम ऑफर्ससह खरेदीसाठी उपलब्ध आहे. चला तर मग नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर एक नजर हा स्मार्टफोन देखील बघून घ्या.

honor 90

HONOR 90 ची किंमत

Honor 90 5G स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 47,999 रुपये आहे. Honor 90 5G च्या 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. यावरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HONOR 90 आता Amazon वरून अनुक्रमे 37,999 रुपये आणि 39,999 रुपयांमध्ये तब्बल 10,000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी केला जाऊ शकतो. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफ बडोदा कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांची इन्स्टंट डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.

HONOR 90 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

HONOR 90 फोनमध्ये 6.7 इंच क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2664×1200 पिक्सेल आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याप्रमाणेच, हे डिवाइस Android 13 आधारित Magic OS 7.1 वर कार्य करते. यासह फोन 8GB रॅम आणि 12GB रॅम आणि 256GB आणि 512GB स्टोरेजसह खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Honor 90 5G IN AMAZON SALE

HONOR 90 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, त्यासोबत 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर देखील उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, ज्यामध्ये 66W फास्ट सुपरचार्ज चार्जिंग सपोर्ट देखील प्रदान करण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo