HONOR 200 Pro 5G वर Amazon सेलदरम्यान मोठी सूट उपलब्ध, होईल हजारो रुपयांची बचत

Updated on 09-Aug-2024
HIGHLIGHTS

HONOR 200 Pro 5G फोन आकर्षक ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी

बँक कार्डद्वारे फोनवर 3,000 रुपयांची वेगळी सूट उपलब्ध

HONOR 200 Pro 5G फोनवर Amazon सेलदरम्यान तब्बल 13000 रुपयांची बचत होणार

Amazon वर ग्रेट फ्रिडम फेस्टिवल सेल सुरु आहे. या सेलदरम्यान, अनेक महागड्या स्मार्टफोन्सवर भारी ऑफर्स उपलब्ध आहेत. तुम्ही सेलदरम्यान मोठ्या सवलतींसह स्मार्टफोन खरेदी करू शकता. जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर, सध्या HONOR च्या नवीनतम HONOR 200 Pro 5G वर या सेलदरम्यान जबरदस्त सवलत मिळत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात किंमत आणि ऑफर्स-

HONOR 200 Pro 5G ची किंमत

HONOR 200 Pro 5G फोनच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Amazon वर 57,998 रुपये आहे. मात्र, Amazon सेल दरम्यान फोनवर मोठी सूट मिळत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HONOR 200 Pro 5G फोनवर 10,000 रुपयांचे डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्हाला बँक कार्डद्वारे फोनवर 3,000 रुपयांची वेगळी सूट देखील मिळेल. अशा प्रकारे, या फोन खरेदीवर तुमच्या तब्बल 13,000 रुपयांची बचत होणार आहे. Buy From Here

HONOR 200 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

HONOR 200 Pro 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा क्वाड कर्व AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, फोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच, हा फोन Android 14 आधारित MagicOS 8.0 वर काम करतो.

Honor 200 Pro

फोटोग्राफीसाठी, HONOR 200 Pro 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS सपोर्टसह 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. त्याबरोबरच, 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 12MP अल्ट्रा-वाइड मॅक्रो सेन्सर देखील उपलब्ध आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा देखील मिळेल. पॉवरसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात 66W वायरलेस सुपरचार्जिंग सपोर्ट देखील मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :