लेटेस्ट Honor 200 Lite 5G फोन Amazon सेलमध्ये अगदी कमी किमतीत उपलब्ध, मिळेल 50MP सेल्फी कॅमेरा 

 लेटेस्ट Honor 200 Lite 5G फोन Amazon सेलमध्ये अगदी कमी किमतीत उपलब्ध, मिळेल 50MP सेल्फी कॅमेरा 
HIGHLIGHTS

Honor ने अलीकडेच नवा स्मार्टफोन Honor 200 Lite 5G फोन लाँच केला.

Amazon सेलदरम्यान तुम्ही हा Honor 200 Lite 5G ऑफर्ससह खरेदी करू शकता.

SBI कार्डद्वारे फोनवर 1250 रुपयांची डिस्काउंट ऑफर मिळणार आहे.

प्रसिद्ध टेक जायंट Honor ने अलीकडेच नवा स्मार्टफोन Honor 200 Lite 5G फोन लाँच केला आहे. हा फोन मध्यम श्रेणीमध्ये सादर करण्यात आला आहे. या बजेटमध्ये हा फोन अगदी अप्रतिम फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. विशेषतः या फोनमध्ये तुम्हाला सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. सध्या हा फोन Amazon GIF सेलदरम्यान सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Honor 200 Lite 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-

Honor 200 Lite 5G फोनवरील ऑफर्स

HONOR 200 Lite 5G फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 17,998 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन सध्या 28% डिस्काउंटसह खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. फोनवरील उपलब्ध डिस्काउंट ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI कार्डद्वारे फोनवर 1250 रुपयांची डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. तर, तुम्ही हा फोन 873 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर देखील खरेदी करू शकता. येथून खरेदी करा

Honor 200 Lite 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

HONOR 200 Lite 5G फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2412×1080 पिक्सेल इतके आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. तसेच, फोन Android 14 आधारित MagicOS 8.0 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅमसाठी सपोर्ट आहे आणि फोनचे स्टोरेज 256GB पर्यंत आहे.

Honor 200 Lite 5G launched in India with super punch hole camera

फोटोग्राफीसाठी, HONOR 200 Lite 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 108MP प्रायमरी कॅमेरा, 5MP वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर देखील आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी HONOR चा हा फोन तब्बल 50MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी या फोनची बॅटरी 4500mAh आहे, ज्यासोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. 4500 mAh ची बॅटरी क्षमता असलेले 6 तासांपर्यंत चालेल.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo