Google Pixel 9 Pro फोनवर तब्बल 10,000 रुपयांचा Discount, ‘या’ ठिकाणी होईल हजारो रुपयांची बचत

Updated on 19-Dec-2024
HIGHLIGHTS

Google ने अलीकडेच आपला नवीनतम स्मार्टफोन Google Pixel 9 Pro भारतीय बाजरात लाँच केला होता.

Google ने हा फोन महागड्या किंमत श्रेणीमध्ये लाँच केला आहे.

या फ्लॅगशिप डिव्हाईसमध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Google ने अलीकडेच आपला नवीनतम स्मार्टफोन Google Pixel 9 Pro भारतीय बाजरात लाँच केला होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा फोन कंपनीने महागड्या किंमत श्रेणीमध्ये लाँच केला आहे. जर तुम्हाला देखील हा फोन खरेदी करायचा असेल तर, तुम्हाला नक्कीच सर्वप्रथम तुमचे बजेट तपासण्याची आवश्यकता आहे. हा फोन खरेदी करू इच्छित ग्राहकांसाठी एक अप्रतिम संधी आहे. सध्या हा फोन Croma वर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

Also Read: JioTag Go: रिलायन्स Jio ने Android सपोर्टसह लाँच केला नवा स्मार्ट ट्रॅकर, पहा किंमत आणि सर्व डिटेल्स

Google Pixel 9 Pro

Google Pixel 9 Pro ची किंमत

Google Pixel 9 Pro स्मार्टफोनची किंमत 109,999 रुपये इतकी आहे. या फोन चा 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट या किंमतीत उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन Rose Quartz, Porcelain, Hazel आणि Obsidian कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. तर, Croma वरून तुम्हाला या फोनवर ऑफर्स मिळतील. ICICI बँक कार्डवर तुम्हाला 10,000 रुपयांची सूट मिळेल. ही डील क्रेडिट कार्डधारकांसाठी आहे. तसेच, या फोनवर 5,178 रुपयांमध्ये मासिक EMI उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, या हँडसेटवर 90 हजार रुपयांहून अधिकची एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. तुम्ही क्रोमा साईटवरून जाऊन ऑफर्सबद्दल अधिक माहिती घेऊ शकता.

Google Pixel 9 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 9 Pro मध्ये 6.3-इंच लांबीचा Super Actua डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. संरक्षणासाठी त्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 बसवण्यात आला आहे. तर, या फोनमध्ये HDR चा सपोर्ट मिळाला आहे. उत्तम कामगिरीसाठी, फोनमध्ये Tensor G4 चिप देण्यात आली आहे. हे डिव्हाइस नवीनतम Android 15 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या मोबाईलमध्ये 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी, पिक्सेल सीरीजच्या या फ्लॅगशिप डिव्हाईसमध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50MP रुंद, 48MP अल्ट्रा-वाइड आणि 48MP टेलिफोटो सेन्सर आहे, जो 5x झूमने सुसज्ज आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 42MP फ्रंट कॅमेरा मिळेल. यामध्ये ऑटोफोकस फंक्शन उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, Google Pixel 9 Pro फोन 4700mAh बॅटरीने सुसज्ज आहे. यात 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :