त्वरा करा! 64MP कॅमेरासह Google Pixel 8a वर 8000 रुपयांचा Discount, ‘या’ ठिकाणी मिळतेय अप्रतिम ऑफर

Updated on 13-Nov-2024
HIGHLIGHTS

Google चा Google Pixel 8 स्मार्टफोन कंपनीच्या लोकप्रिय स्मार्टफोन आहे.

Google Pixel 8 वर देखील तब्बल 8000 रुपयांची सूट मिळत आहे.

Flipkart वर बिग बचत डेज सेलचा आज शेवटचा दिवस आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Google चा Google Pixel 8a स्मार्टफोन कंपनीच्या लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या यादीमधील आहे. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर बिग बचत डेज सेलचा आज शेवटचा दिवस आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सेलदरम्यान अनेक महागड्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आणि ऑफर्स मिळत आहेत. दरम्यान, Google Pixel 8a वर देखील तब्बल 8000 रुपयांची सूट मिळत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Google Pixel 8a ची किंमत आणि ऑफर्स पाहुयात-

Also Read: 32MP Front Camera Smartphones: 30 हजार रुपयांअंतर्गत सेल्फी शौकीन युजर्ससाठी बेस्ट फोन्स, पहा यादी

Google Pixel 8a ची किंमत आणि ऑफर्स

Google Pixel 8a फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 52,999 रुपये आहे. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे, सध्या फ्लिपकार्ट सेल दरम्यान या फोनवर प्रचंड सवलत उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart वरून Google Pixel 8a फोन खरेदी केल्यास तुम्हाला 6000 रुपयांची थेट सूट मिळेल. तर, डिस्काउंटनंतर ते 46,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याबरोबरच, बँक कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांची वेगळी सूट देखील उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

Google Pixel 8a चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 8a फोनमध्ये 6.1 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2400x 1080 पिक्सेल आहे. त्याबरोबरच, डिस्प्लेमध्ये 2000nits पर्यंत ब्राइटनेस मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Google Pixel 8a फोन Tensor G3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आहे. तर, 128GB आणि 256GB चे दोन पर्याय उपलब्ध आहेत. हा फोन ऑब्सिडियन, एलो, पोर्सिलीन आणि बे अशा चार कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी, Google Pixel 8a फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा आणि 13MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमधील 64MP मेन कॅमेरा तपशीलवार आणि शार्प फोटोज कॅप्चर करतो. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4404mAh बॅटरी आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :