Google Pixel 8 वर मिळतोय थेट हजारो रुपयांचा Discount! फ्लॅगशिप फोनवर आतापर्यंतची Best ऑफर
Google Pixel 8 स्मार्टफोन त्याच्या लाँच प्राईसपेक्षा 14 हजार रुपये स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध
ICICI बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यावर तुम्हाला तब्बल 8,000 रुपयांची सवलत
उत्तम कार्यक्षमतेसाठी, Google Pixel 8 फोनमध्ये Tensor G3 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
जर तुम्ही Google Pixel स्मार्टफोन्सचे चाहते असाल तर आणि खरेदी करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. होय, तुम्हालाही स्वस्तात महागडा फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर आता तुमच्याकडे Google Pixel 8 स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. Google Pixel 8 स्मार्टफोन त्याच्या लाँच प्राईसपेक्षा 14 हजार रुपये स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात Google Pixel 8 ची आणि त्यावरील ऑफर्स-
महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Google ने या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये स्वतःचा पॉवरफुल प्रोसेसर आणि अनेक अप्रतिम फीचर्सचा वापर केला आहे.
Also Read: Samsung Galaxy F15 5G Airtel Edition भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 8 ची भारतात किंमत
Google Pixel 8 गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारात 75,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. ही किंमत या फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटसाठी आहे. पण, आता हे व्हेरिएंट Flipkart वर 61,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आले आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Google Pixel 8 स्मार्टफोन खरेदी करताना ICICI बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यावर तुम्हाला तब्बल 8,000 रुपयांची सवलत मिळणार आहे. याशिवाय, फोनसह 55,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरदेखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
Google Pixel 8 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 8 मध्ये 6.2-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, जो 60 Hz-120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शन्ससाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचा वापर केला आहे. उत्तम कार्यक्षमतेसाठी, या फोनमध्ये Tensor G3 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. यात 50 MP चा वाइड कॅमेरा सेन्सर असून 12 MPचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.5MP चा ड्युअल पीडी सेल्फी सेन्सर फ्रंटला उपलब्ध असेल. तसेच, या फ्लॅगशिप फोनमध्ये 4575 mAh बॅटरी आहे, जी 30W चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन 30 मिनिटांत 50% चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile