50MP कॅमेरासह येणारा Google Pixel 8 फोन 12000 रुपयांनी स्वस्त, मिळतोय प्रचंड Discount। Tech News 

50MP कॅमेरासह येणारा Google Pixel 8 फोन 12000 रुपयांनी स्वस्त, मिळतोय प्रचंड Discount। Tech News 
HIGHLIGHTS

Google Pixel 8 फोन प्रचंड सवलतीसह खरेदी करण्याची संधी

हा फोन एक दोन नव्हे तब्बल 12000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल.

Flipkart मंथ एंड मोबाईल फेस्ट सेल दरम्यान सवलत उपलब्ध

जर तुम्ही Google स्मार्टफोन्सचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बरेच दिवसांपासून तुम्ही Google ची लेटेस्ट सिरीज खरेदी करण्याचा विचार करत आहात, पण बजेटमुळे शक्य वाटत नाही. तर, काळजी करू नका कारण आता Google Pixel 8 फोन प्रचंड सवलतीसह खरेदी करता येणार आहे. होय, Flipkart वर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आली आहे. Flipkart वरून हा फोन एक दोन नव्हे तब्बल 12000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल. 

हे सुद्धा वाचा: VI युजर्सची मज्जाच मजा! ‘या’ प्लॅन्समध्ये लोकप्रिय फूड App चे महागडे सब्सक्रिप्शन वर्षभर Free। Tech News

Google Pixel 8
Google Pixel 8

Google Pixel 8 ची किंमत आणि ऑफर्स 

Google Pixel 8 फोनचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल Flipkart वरून 75,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. Google Pixel 8 फोन Flipkart मंथ एंड मोबाईल फेस्ट सेल दरम्यान अतिशय स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. तुम्हाला बँक कार्डद्वारे अतिरिक्त सूट देखील मिळेल. तसेच, एक्सचेंज ऑफरअंतर्गत फोनवर तब्बल 12000 रुपयांपर्यंत ऑफ मिळण्याची शक्यता आहे. Buy from here

Google Pixel 8 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

google pixel 8

Google Pixel 8 मध्ये 6.2 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन Tensor G3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. नवीनतम मोबाइल प्रोसेसरचा मुख्य विक्री बिंदू हा आहे की त्यामध्ये अधिक AI आणि मशीन लर्निंग क्षमता आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना डिव्हाइसवर आणि क्लाउडमध्ये अधिक डेटा क्रंच करता येतो. त्याबरोबरच, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे.

Google Pixel 8 मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 12MP सेकंडरी कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.5MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी Google Pixel 8 मध्ये 4575mAh बॅटरी आहे. हा फोन बॅटरी सेव्हर मोडवर 72 तास चालतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo