Best Offer! Google Pixel 8 Pro वर मिळतोय तब्बल 14 हजार रुपयांचा Discount, Flipkart वर उपलब्ध

Updated on 11-Jan-2024
HIGHLIGHTS

Google Pixel 8 Pro फोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी

या स्मार्टफोनवर बँक ऑफर्स, EMI ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स उपलब्ध

फोनमध्ये 30W फास्ट चार्जिंगसह 5050mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Google ची Google Pixel 8 Pro हा लेटेस्ट स्मार्टफोन लाँच झाल्यापासूनच लोकप्रिय झाला आहे. हा फोन आपल्या फीचर्ससह सर्वोत्तम स्मार्टफोन्सच्या यादीत गणला जातो. तुम्हाला देखील नवा Google स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे. कारण, आता Google Pixel 8 Pro फोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन Flipkart वरून ऑफर्ससह कमी किमतीत खरेदी करता येईल.

हे सुद्धा वाचा: Amazon Great Republic Day 2024 सेलची तारीख जाहीर, प्रचंड Discount सह होणार ऑफर्सचा वर्षाव। Tech News

Google Pixel 8 Pro ची किंमत आणि ऑफर्स

Google Pixel 8 Pro 5G ची किंमत 1,06,999 रुपयांपासून सुरू होते. तर, त्याचा टॉप व्हेरिएंट 1,13,999 रुपयांना उपलब्ध आहे. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart वरून Google चा हा 5G स्मार्टफोन खरेदी केल्यास निवडक बँक कार्डवर 14,000 रुपयांची सूट उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Google Pixel 8 Pro

एवढेच नाही तर, तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असल्यास या फोनवर 1,13,999 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. मात्र, या ऑफर्सही सुसंगत तुमचा जुना किंवा विद्यमान फोन असावा. महागडा फोन सहज खरेदी करण्यासाठी हा फोन मासिक हप्त्यांवर खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

Google Pixel 8 Pro

या Google स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन ऑलवेज-ऑन डिस्प्ले सह येतो. प्रोटेक्शनसाठी हा हँडसेट कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षणासह येतो. सर्वोत्तम कामगिरीसाठी, फोनमध्ये कंपनीची इन-हाऊस चिप टेन्सर G3 प्रदान करण्यात आली आहे. हा फोन 12GB रॅम सह येतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, बेस व्हेरियंटमध्ये 128GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. तर, टॉप व्हेरिएंट 256GB स्टोरेजसह येतो. इंटर्नल स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो SD कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मेन कॅमेरा, 48MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 48MP थर्ड सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोरील बाजूस 10.5MP सेंसर देण्यात आला आहे. तर फोनला पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 5050mAh बॅटरी आहे, जी 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. ही बॅटरी 30 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. यासाठी फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :