Diwali Sale! ‘हा’ लोकप्रिय Google Pixel स्मार्टफोन हजारो रुपयांनी स्वस्तात उपलब्ध, मिळेल 8,000 रुपयांची सूट। Tech News 

Diwali Sale! ‘हा’ लोकप्रिय Google Pixel स्मार्टफोन हजारो रुपयांनी स्वस्तात उपलब्ध, मिळेल 8,000 रुपयांची सूट। Tech News 
HIGHLIGHTS

लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkartवर बिग दिवाली सेल सुरु आहे.

तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये केवळ 32,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

SBI बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सुमारे 3000 रुपयांची अधिक बचत होईल.

लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkartवर बिग दिवाली सेल सुरु आहे. या सेलमध्ये Google Pixel 7a स्मार्टफोन अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. सध्या, तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये केवळ 32,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. म्हणजेच या स्मार्टफोनवर तुम्हाला हजारो रुपयांची बचत करता येणार आहे.

होय, जर आपण Google Pixel 7a च्या लाँच किंमतीबद्दल बोललो तर हा फोन 43,999 रुपये किंमतीला लाँच करण्यात आला होता. फोनच्या किमतीत आलेल्या कपातीनंतर या फोनची किंमत 35,000 रुपये इतकी सूचिबद्ध आहे. तुम्ही आजपासून हा फोन Flipkart वर खरेदी करू शकता.

Google Pixel 7a price drop on flipkart
Image: Google Pixel 8

हे सुद्धा वाचा: भारीच की! आता अजिबात वेळ वाया जाणार नाही, WhatsApp वर येणार YouTube सारखे Important फिचर। Tech News

फ्लिपकार्टवर Pixel 7a च्या किमतीत कपात

Google Pixel 7a स्मार्टफोनची किंमत सध्या फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये 35,999 रुपये आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनची लाँच किंमत सुमारे 43,999 रुपये होती. म्हणजेच तुम्हाला या फोनवर जवळपास 8000 रुपयांची सूट दिली जात आहे.

फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्ही SBI बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्ही सुमारे 3000 रुपये अधिक वाचवू शकता. यानंतर फोनची किंमत फक्त 32,999 रुपये राहील. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर, फोनवर उपलब्ध असलेली ही डील सर्वोत्कृष्ट आहे. येथून खरेदी करा

Google Pixel 7a चे मुख्य स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरमध्ये 6.1-इंच स्क्रीन आहे. हे 90Hz रिफ्रेश रेटसह येते. परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये गुगलचा फ्लॅगशिप टेन्सर G2 प्रोसेसर उपलब्ध आहे. खरं तर, तुम्हाला Google Pixel 7a मध्ये उत्तम कॅमेरा अनुभव मिळतो.फोनमध्ये 64MP मेन आणि 13MP चा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 13MPचा फ्रंट कॅमेरा देखील मिळेल. फोनमध्ये 4385mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगसह उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo