64MP कॅमेरासह Google Pixel 7a वर मिळतोय भरपूर Discount, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध 

64MP कॅमेरासह Google Pixel 7a वर मिळतोय भरपूर Discount, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध 
HIGHLIGHTS

प्रसिद्ध Google Pixel फोनवर अनेक सोनेरी सौदे आणि सवलतीच्या ऑफर उपलब्ध

बेस्ट सेलिंग स्मार्टफोन Google Pixel 7a वर मिळणार अप्रतिम ऑफर्स

ICICI बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 2000 रुपयांची वेगळी सूट

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सणासुदीच्या हंगामात अनेक स्मार्टफोन्सवर भारी डील्स उपलब्ध आहेत. या दरम्यान, प्रसिद्ध Google Pixel फोनवर अनेक सोनेरी सौदे आणि सवलतीच्या ऑफर आणल्या आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Google Pixel 7a वर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. फोनमध्ये तुम्हाला 64MP मेन कॅमेरा आणि मोठी बॅटरी मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Google Pixel 7a वरील सर्व ऑफर्स जाणून घेऊयात-

Also Read: Price Cut! 50MP कॅमेरासह येणारा Vivo V30 फोनच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवी किंमत

google pixel 7
google pixel 7

Google Pixel 7a ची किंमत

Google Pixel 7a फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Flipkart वर 43,999 रुपये इतकी आहे. या फोनवर अनेक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. ICICI बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 2000 रुपयांची वेगळी सूट मिळेल. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5% कॅशबॅकची सुविधा मिळेल. एवढेच नाही तर, या फोनवर 24,700 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. येथून खरेदी करा

Google Pixel 7a चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 7a फोनमध्ये 6.1 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल इतके आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Tensor G2 प्रोसेसरसह येतो. तसेच, हा फोन Android 13 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. फोनमध्ये ब्लॅक, व्हाइट, कोरल आणि सी कलरचे पर्याय उपलब्ध आहेत.

google pixel 7a

Google Pixel 7a मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 64MP प्राथमिक कॅमेरा आहे. तसेच, या फोनमध्ये 13MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 4300mAh बॅटरी देण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo