Google चे स्मार्टफोन्स स्टयलिश डिझाईन, लूक्स आणि अप्रतिम कॅमेरासह येतात. हे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. दरम्यान, Google च्या लोकप्रिय स्मार्टफोन्समध्ये Google Pixel 7a वर अप्रतिम डिस्काउंट मिळत आहे. यासह तुम्ही Google Pixel 7A स्मार्टफोन आता Flipkart द्वारे स्वस्तात घरी आणू शकता. सेल दरम्यान फोनच्या खरेदीवर 5000 रुपयांची बचत आहे. जाणून घ्या ऑफर्स-
हे सुद्धा वाचा: Amazing! iPhone मध्ये येणार ‘Underwater Mode’, आता पाण्यामध्येही घेता येतील फोटोज आणि व्हीडिओ। Tech News
Google Pixel 7a फोनचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 40,999 रुपयांना Flipkart वर सूचिबद्ध आहे. याबरोबर, अनेक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत, जेणेकरून हा स्मार्टफोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकाल. Google Pixel 7a वर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, फोनवर 3000 रुपयांची सवलत मिळेल. तसेच, बँक कार्डने व्यवहार केल्यास 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. अशा प्रकारे, तुम्ही या फोनच्या खरेदीवर एकूण 5000 रुपयांची बचत करू शकता. येथून खरेदी करा
Google Pixel 7a स्मार्टफोनमध्ये 6.1 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये Tensor G2 प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरसह उच्च-गुणवत्तेचे फोटो आणि व्हिडिओ, पॉवरफुल सिक्योरिटी, परफॉर्मन्स मिळेल. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी, Google Pixel 7a मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 64MP आहे, ज्याला OIS सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. तर, 13MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4300mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे.