Best Offer! Google Pixel 7 Pro फोनवर मिळतोय तब्बल 21,000 रुपयांचा Discount, ‘ही’ डील पुन्हा मिळणार नाही
Google Pixel 7 Pro फोन अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.
Flipkart सेलदरम्यान Google Pixel 7 Pro वर 21000 रुपयांची सवलत मिळत आहे.
फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Google Tensor G2 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
Google चे लोकप्रिय स्मार्टफोन्स खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे चांगले बजेट असण्याची आवश्यकता आहे. मात्र, Google Pixel स्मार्टफोनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘Flipkart मंथ एन्ड मोबाईल फेस्ट सेल’ दरम्यान तुम्ही Google Pixel 7 Pro फोन अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. या सेलदरम्यान Google Pixel 7 Pro वर 21000 रुपयांची सवलत मिळत आहे. Flipkart वरून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास हजारो रुपयांची बचत करता येईल.
हे सुद्धा वाचा: लेटेस्ट Vivo T3x 5G ची पहिली Sale आजपासून होणार सुरु, जबरदस्त ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News
Google Pixel 7 Pro ची किंमत
Google Pixel 7 Pro फोनचे 12GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल Flipkart सेलदरम्यान 17,000 रुपयांचा ऑफ मिळत आहे. या सवलतीसह हा स्मार्टफोन 67,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक कार्डद्वारे फोनवर 4000 रुपयांची वेगळी सूट दिली जात आहे. तुम्ही हा फोन 63,999 रुपयांना खरेदी करू शकता. अशाप्रकारे, तुम्ही फोनच्या खरेदीवर एकूण 21000 रुपयांची बचत करू शकता. येथून खरेदी करा
Google Pixel 7 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 7 Pro फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा क्वाड HD+ डिस्प्ले आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Google Tensor G2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. टेन्सर उच्च-गुणवत्तेचे फोटो आणि व्हिडिओ, पॉवरफुल सिक्योरिटी, परफॉर्मन्स Pixel ला पूर्वीपेक्षा अधिक उपयुक्त बनवते. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 12GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी Google Pixel 7 Pro फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. त्याबरोबरच, यात 48MP सेकंडरी कॅमेरा आणि 12MP चा तिसरा कॅमेरा आहे. फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4926mAh बॅटरी दिली गेली आहे. हा फोन बॅटरी सेव्हर मोडवर 72 तासांपर्यंत वापरण्याची सुविधा देतो, असा दावा कंपनीने केला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile