कमी किमतीत iPhone 14 खरेदी करण्यासाठी संध्या क्वचितच मिळतात. मात्र, आज तुमच्यासाठी ही संधी चालून आली आहे. तुम्ही तुमच्या बजेट किंमतीत iPhone 14 खरेदी करू शकणार आहात. जर तुम्ही ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून iPhone 14 खरेदी केला तर तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. कसे ? ते बघुयात-
iPhone 14 चा 128GB व्हेरिएंट भारतात 79,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र, हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर 71,999 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. बँक ऑफर्स बद्दल बोलायचे झाले तर तुम्ही HDFC कार्ड वापरू शकता. या कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला 4000 रुपयांपर्यंतच्या सवलतीचा लाभ मिळणार आहे. यासह या डिव्हाइसची किंमत 67,999 रुपयांपर्यंत कमी होणार आहे.
याशिवाय, तुम्हाला एक्सचेंज ऑफरचाही लाभ मिळेल. यामध्ये तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण करून 22,500 रुपये वाचवू शकता. लक्षात ठेवा की, एक्सचेंज व्हॅल्यूचा संपूर्ण फायदा तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल, बॅटरी आणि स्थितीवर अवलंबून असेल. येथून खरेदी करा
विशेष म्हणेज, जर तुम्ही या फोनच्या iPhone 13 बदल्यात एक्सचेंज केले तर, तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळणार आहे.
Apple iPhone 14 मध्ये तुम्हाला 6.1-इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल, जो 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याबरोबरच, डिस्प्ले HDR ला सपोर्ट करतो आणि 1200-nits ब्राइटनेस आणि फेस आयडी सेन्सरसह येतो. iPhone 14 मध्ये A15 बायोनिक चिपसेट 16-कोर NPU आणि 5-कोर ग्राफिक्स प्रोसेसर आहे. यात 4GB पर्यंत RAM आणि तीन 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज पर्याय आहेत.