Amazon sale offer Rs 5000 flat bank discount on Oneplus 13 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OnePlus ने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये आपली प्रीमियम लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus 13 सिरीज लाँच केली. OnePlus चे स्मार्टफोन्स आपल्या उत्तम कॅमेरासाठी ओळखले जातात. सध्या Amazon या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स आणि डील्स देत आहेत. तुम्ही हा फोन यासह अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात OnePlus 13 ची किंमत आणि डिस्काउंट-
Also Read: मोठी बॅटरी, भारी कॅमेरासह येणाऱ्या Vivo T3 Pro 5G वर Discount! सर्वोत्तम ऑफर्ससह खरेदीची संधी
OnePlus 13 फोनचा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 69,998 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर बँक कार्डवर मोठी सूट उपलब्ध आहे. ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर तब्बल 5000 रुपयांची सूट मिळत आहे. त्याबरोबरच, तुम्ही हा फोन 3,394 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर देखील खरेदी करू शकता. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
OnePlus 13 फोनमध्ये 6.82-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या फोनच्या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 3169×1440 पिक्सेल इतका आहे.
तसेच, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन नवीनतम Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच, हा फोन Android 15 आधारित OxygenOS वर काम करतो. कंपनीने या फोनसोबत 4 वर्षांचे ओएस अपडेट्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी पॅच अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.
याव्यतिरिक्त, OnePlus 13 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनमध्ये 50MP सोनी LYT-808 प्रायमरी कॅमेरा, 50MP सोनी LYT-600 टेलिफोटो सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. एवढेच नाही तर, तुम्हाला सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.
OnePlus 13 फोनची बॅटरी 6000mAh आहे. या फोनमध्ये तुम्हाला 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. ही बॅटरी दीर्घकाळ टिकण्याची क्षमता ठेवते.
OnePlus 13 फोन 12G RAM + 256GB स्टोरेज, 16GB RAM + 512GB स्टोरेज आणि 24GB RAM + 1TB स्टोरेज अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.