बजेट स्मार्टफोन सादर करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या OPPO कंपनीने आपल्या Oppo A38 स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत आता कंपनीने आणखी कमी केली आहे. होय, या फोनच्या किमतीत कंपनीने तब्बल 3000 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे हा फोन तुम्ही आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात Oppo A38 ची नवी किंमत-
हे सुद्धा वाचा: Good News! आता ATM कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही, UPI द्वारे होतील पैसे जमा, RBI ने केली घोषणा। Tech News
कंपनीने काही महिन्यांपूर्वीच Oppo A38 फोन भारतात लाँच केला आहे. कंपनीने या फोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 12,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, आता कंपनीने या फोनची किंमत 3000 रुपयांनी कमी केली आहे. त्यानंतर, तुम्ही हा फोन फक्त 9,999 रुपयांना खरेदी करू शकता.
उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने आपल्या अधिकृत साइटवर फोनची नवीन किंमत सूचीबद्ध केली आहे. या फोनमध्ये आता ब्लॅक आणि गोल्ड असे दोन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
Oppo A38 फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. सुरळीत कामकाजासाठी, फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज करण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
होय, या सेटअपमध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा, 2MP पोर्ट्रेट सेन्सर उपलब्ध आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, Oppo A38 मध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ 5.3 आणि USB टाइप-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.