Moto e13 Sale Offers: पहिल्या सेलमध्ये Flipkart वर होणार ऑफर्सचा वर्षाव, सर्वात स्वस्त स्मार्टफोन
Motorola चा 8GB RAM सह सर्वात स्वस्त स्मार्टफोन e13 अलीकडेच भारतात लाँच
कंपनीचा दावा आहे की, 8GB रॅम सह येणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे.
या स्मार्टफोनची पहिली विक्री आज ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर होणार आहे.
Motorola चा 8GB RAM सह सर्वात स्वस्त स्मार्टफोन e13 अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनची पहिली विक्री आज ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर होणार आहे. हा फोन वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आला होता. हा स्मार्टफोन वर्षाच्या सुरुवातीला दोन स्टोरेज व्हेरिएंट म्हणजेच 2GB RAM + 64GB आणि 4GB RAM + 64GB मध्ये सादर करण्यात आला होता. त्यानंतर, फोनचा 8GB रॅम व्हेरिएंट नुकताच भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की 8GB रॅम सह येणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे. बघुयात किंमत आणि ऑफर्स.
Moto e13 ची किंमत:
वर सांगितल्याप्रमाणे हा स्मार्टफोन 2GB RAM + 64GB, 4GB RAM + 64GB आणि 8GB RAM + 128GB या तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये आहे, तर त्याच्या इतर दोन व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 7,299 रुपये आणि 8,999 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 8GB रॅमचा सपोर्ट हा पहिला फोन आहे, जो 9000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतो.
ऑफर्स:
फ्लिपकार्टवरून आज म्हणजेच 16 ऑगस्ट दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. अरोरा ग्रीन, कॉस्मिक ब्लॅक आणि क्रीमी व्हाइट या तीन कलर ऑप्शन्समध्ये फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. पहिल्या सेलमध्ये फ्लिपकार्टवरून हा फोन खरेदी केल्यास 2000 रुपयांची विशेष सूट दिली जाणार आहे. फ्लिपकार्ट Axis बँक कार्डवरून हा फोन खरेदी केल्यास 5% कॅशबॅक मिळेल. तसेच, फोनच्या खरेदीवर नो-कॉस्ट EMI देखील देण्यात येत आहे.
Moto e13
Motorola चा हा फोन स्लीक आणि स्टायलिश प्रीमियम डिझाइनसह येतो. या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच लांबीचा अल्ट्रा-वाइड IPS LCD डिस्प्ले आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइन उपलब्ध आहे. या डिस्प्लेसह युजर तेजस्वी सूर्यप्रकाशात आरामात फोन बघू शकतो. Motorola चा हा अल्ट्रा बजेट फोन Android 13 Go ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. हे फक्त फेस अनलॉक आणि पॅटर्न लॉक यासारख्या मूलभूत सुरक्षा फीचर्ससह येते.
Unisoc T606 प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, T606 जलद डाउनलोड आणि अपलोड, जबरदस्त ग्राफिक्स आणि फोटो आणि पॉवर-सेव्हिंग कार्यप्रदर्शनास समर्थन देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज आहे, जे microSD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.
Moto e13 बजेट स्मार्टफोन सिंगल रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा सह येतो. त्याच्या मागील बाजूस 13MP मुख्य कॅमेरा आहे, ज्यामध्ये LED फ्लॅशलाइट उपलब्ध असेल. सामान्य वापरकर्त्यांसाठी, 13MP कॅमेरा हा फोनसाठी पुरेसा हाय कॉलिटीचा कॅमेरा असतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे.हा फोन 5000mAh मजबूत बॅटरी आणि USB टाइप C फास्ट चार्जिंग फीचरला सपोर्ट करतो. ही बॅटरी सामान्य वापरावर तब्बल दोन दिवस टिकू शकते. हा स्मार्टफोन IP52 वॉटर रिपेलेंट आहे आणि डॉल्बी ATMOS फीचरला सपोर्ट करतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile