बजेटमध्ये येणार स्मार्टफोन Infinix Hot 12 Play भारतात लाँच.
Infinix च्या या फोनची विक्री 30 मे पासून Flipkart या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे.
Infinix Hot 12 Play हा नवीन फोन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच झालेल्या Infinix Hot 11 Play ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे.
आजकाल उत्तम प्रतीचे आणि दर्जेदार स्मार्टफोन हवे असल्यास आपल्याला कमीत-कमी 25 ते 30 हजार रुपये खर्च करावे लागतात. अशातच बऱ्याच टेक कंपन्या आता उत्तम प्रतीचे आणि दर्जेदार फोन ग्राहकाला परवडणाऱ्या किमतीत लाँच करताना दिसत आहेत. Infinix Hot 12 Play हा स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच झाला आहे. या लेखात आपण बजेटमध्ये येणाऱ्या या नवीन स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत….
Infinix ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Infinix Hot 12 Play लाँच केला आहे. हा नवीन फोन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच झालेल्या Infinix Hot 11 Play ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. Infinix Hot 12 Play ड्युअल रियर कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. Infinix Hot 12 Playमध्ये Unisoc T610 प्रोसेसरसह 64 GB स्टोरेज मिळेल. त्याबरोबरच, फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमही उपलब्ध आहे.
Infinix Hot 12 Playची किंमत:
Infinix Hot 12 Play ची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेजची आहे. स्मार्टफोन सॅम्पेन गोल्ड, डेलाइट ग्रीन, हॉरीझन ब्लू आणि रेसिंग ब्लॅक या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. Infinix च्या या फोनची विक्री 30 मे पासून Flipkart या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. कृपया लक्षात घ्या की ही लाँचिंग किंमत आहे.
Infinix Hot 12 Play चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Hot 12 Playमध्ये Android 11 सह XOS 10 मिळेल. यात 90Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.82-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 480 निट्स आहे. फोनमध्ये UniSoc T610 प्रोसेसर आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. यात 4 GB रॅमसह 3 GB व्हर्च्युअल रॅम देखील मिळेल. त्याबरोबरच या फोनमध्ये 64 GB स्टोरेज आहे.
Infinix Hot 12 Play मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 13 मेगापिक्सेल आहे. त्यासोबतच क्वाड फ्लॅश लाईट देखील आहे. मात्र, इतर लेन्सबद्दल अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. आकर्षक सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
शिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी Infinix Hot 12 Play मध्ये 4G LTE, WCDMA, GSM, Wi-Fi 02.11 a/b/g/n, Bluetooth v5 आणि GPS/ A-GPS आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.