BSNL ग्रामीण भागांमध्ये देणार आहे 100Mpbs इंटरनेट कनेक्शन

Updated on 05-Jul-2018
HIGHLIGHTS

काही दिवसांपूर्वी भारत संचार निगम लिमिटेड, BSNL ने अशी घोषणा केली होती की ते VSAT Gateways येऊर, महाराष्ट्र इथे लावणार आहेत. त्याचबरोबर कंपनी ने हे पण सांगितले होते की ते देशातील दूरवरच्या भागांमध्ये पण हाई-स्पीड इंटरनेट देणार आहे.

BSNL to Provide 100mbps Speed at Rural Areas: काही दिवसांपूर्वी भारत संचार निगम लिमिटेड, BSNL ने अशी घोषणा केली होती की ते VSAT Gateways येऊर, महाराष्ट्र इथे लावणार आहेत. त्याचबरोबर कंपनी ने हे पण सांगितले होते की ते देशातील दूरवरच्या भागांमध्ये पण हाई-स्पीड इंटरनेट देणार आहे. या भागांमध्ये नार्थ-ईस्ट, जम्मू आणि कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इतरांचा समावेश आहे. त्याचबरोबर यात छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, मध्य प्रदेश, झारखंड इत्यादी पण आहेत. 

असे पण समोर येत आहे की कंपनी बुलंदशहर जवळ उत्तर प्रदेश मधील सिकंदराबाद मध्ये पण आपला एक VSAT gateway इनस्टॉल करणार असल्याचे बोलले जात आहे. हे लागल्यामुळे तिथे राहणार्‍या यूजर्सना 100Mbps पर्यंतचा स्पीड मिळणार आहे. 

टेलीकॉम कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या डाटा च्या स्पर्धेत कोणतीही कंपनी मागे राहू इच्छित नाही. हे पाहून BSNL ने एक मोठे पाऊल टाकले आहे, आणि त्यांनी आपल्या प्रीपेड प्लान्स ची डेली लिमिट 2GB ने वढावली आहे. हे पाऊल कंपनी ने रिलायंस जियो ला टक्कर देण्यासाठी टाकले आहे. या मुळे कंपनी च्या प्रीपेड प्लान्स मध्ये आता 2GB डाटा अधिक मिळेल. 

प्रीपेड अनलिमिटेड कॉम्बो बद्दल बोलायचे झाले तर हे Rs 999, Rs 666, Rs 485, Rs 429 आणि Rs 186 आशा किंमतीत येतात, आता या प्लान्स मध्ये तुम्हाला अतिरिक्त 2GB डेली डाटा मिळणार आहे. त्याचबरोबर 3G डाटा STV प्लान्स बद्दल बोलायचे तर Rs 448, Rs 444, Rs 333, Rs 349, आणि Rs 187 वाले प्लान्स पण याच डाटा सह येत आहेत. 

काही दिवसांपूर्वी कंपनी ने काही बदल केले आहेत. कंपनी ने आता आपल्या Rs 241 मधील डाटा STV मध्ये बदल केल्याची घोषणा केली आहे, त्याचबरोबर कंपनी च्या इतर प्लान म्हणजे Rs 155, Rs 198 या मध्ये ही बदल झाले आहेत. कंपनी चा Rs 198 वाला प्लान पाहता हा एक प्रसिद्ध प्लान आहे, आता कंपनी याला जास्त प्रसिद्ध करू पाहत आहे. त्यामुळे कंपनी ने या प्लान मध्ये आता 2.5GB डाटा प्रतिदिन द्यायला सुरवात केली आहे आणि या प्लान ची वैधता 24 दिवस आहे, हे पण लक्षात असू दे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :