BSNL ने आपल्या या प्लान मध्ये केला मोठा बदल, आता होईल जास्त फायदा

Updated on 09-May-2018
HIGHLIGHTS

रिलायंस जियो कडून मिळणार्‍या मोठया स्पर्धे आधीच BSNL ने आपल्या फाइबर ब्रॉडबँड प्लान्स मध्ये मोठे बदल करत आहे, काही नवीन प्लान्स सादर करत आहे, तर काहींमध्ये बदल करत आहे.

रिलायंस जियो कडून मिळणार्‍या मोठया स्पर्धे आधीच BSNL ने आपल्या फाइबर ब्रॉडबँड प्लान्स मध्ये मोठे बदल करत आहे, काही नवीन प्लान्स सादर करत आहे, तर काहींमध्ये बदल करत आहे. तुम्हाला तर माहित आहे की जियोफाइबर येणार्‍या काही दिवसांमध्ये लॉन्च होणार आहे. त्यामुळे BSNL ला आपल्या यूजर्स ची खास काळजी ठेवावी लागणार आहे, म्हणून कंपनी ने आपल्या केरळ सर्कल मध्ये काही नवीन ऑफर्स सादर केल्या आहेत. कंपनी ने आपल्या तीन ब्रॉडबँड प्लान्स मध्ये FUP डाटा लिमिट दुप्पट केली आहे. पण यांच्या किंमतीत कही बदल केला नाही. म्हणजे कंपनी तुम्हाला त्याच किंमतीत जास्त फायदा देणार आहे. केरल मध्ये BSNL चा एक मोठा सब्सक्राइबर बेस आहे. त्यामुळे या राज्यातील यूजर्सना आकर्षित करण्यात कंपनी मागे नाही राहत. 
चला जाणून घेऊया कोणत्या प्लान्स मध्ये बदल केले आहेत 
FIBro BBG ULD 1045 CS48
BSNL च्या ब्रॉडबँड प्लान्स ची सुरवात या प्लान पासून होते. यात तुम्हाला 30Mbps च्या स्पीड ने 100GB डाटा ची FUP लिमिट मिळते. पण याआधी या प्लान मध्ये तुम्हाला 50GB ची लिमिट मिळत होती. या प्लान मध्ये तुम्हाला FUP लिमिट संपल्यावर पण अनलिमिटेड एक्सेस मिळतो, पण स्पीड कमी होऊन फक्त 2Mbps राहतो. या प्लान बद्दल बोलायचे तर सर्व टॅक्स आणि सर्विस चार्ज मिळून तुम्हाला यासाठी मासिक रेंटल म्हणून Rs 1,045 द्यावे लागतात. 
FIBro BBG ULD 1395 CS49
या प्लान मध्ये तुम्हाला 40Mbps च्या बँडविड्थ सह 150GB FUP डाटा मिळतो. याआधी या प्लान मध्ये तुम्हाला 75GB FUP डाटा लिमिट मिळत होती. या प्लान मध्ये तुम्हाला FUP लिमिट संपल्यावर 2Mbps चा स्पीड मिळतो. या प्लान साठी तुम्हाला मासिक रेंटल म्हणून Rs 1,395 द्यावे लागतात. 
FIBro BBG ULD 1895 CS129 
सर्वात शेवटी याच प्लान मध्ये बदल करण्यात आले आहेत. या प्लान मध्ये तुम्हाला 50Mpbs च्या स्पीड ने 200GB FUP डाटा मिळत आहे, पण याआधी या प्लान मध्ये तुम्हाला 100GB डाटा मिळत होता. तसेच जेव्हा हा डाटा संपतो तेव्हा तुम्हाला 2Mbps चा स्पीड मिळतो. या प्लान चे मासिक रेंटल Rs 1,895 आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :