देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी BSNL ने “फ्री टू होम सेवा” सुरु केली आहे. ह्याच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाईल कॉल्सला BSNL च्या लँडलाइनवर ट्रान्सफर करु शकतो. त्यासाठी आपल्याला वेगळी किंमत मोजावी लागणार नाही.
आपल्या एका विधानात BSNL ने असे म्हटले आहे की, “BSNL ने सुरु केलेल्या आपल्या फ्री टू होम सेवेच्या” अंतर्गत मोबाईल यूजर्स आपल्या मोबाईल कॉल्सला BSNL च्या लँडलाइनवरसुद्धा घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना कोणतीही अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार नाही. कारण ही सेवा तुम्हाला मोफत मिळत आहे. ह्या सेवेचा लाभ तुम्ही तुमच्या ऑफिस किंवा घरातही घेऊ शकता.
हेदेखील पाहा – झोलो वन HD रिव्ह्यू
ह्या फीचरच्या माध्यमातून तुम्ही बरेचसे कॉल्स फॉरवर्डसुद्धा करु शकाल. तसेच जेव्हा तुम्ही व्यस्त असाल, तेव्हा तो कॉल आपोआप डायव्हर्टसुद्धा होईल. जर तुमचा मोबाईल फोन ऑफ असेल, तेव्हासुद्धा हा कॉल डायव्हर्ट होईल. ह्या सेवेविषयी टेलिकॉम मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ३० मे ला माहिती दिली होती.
त्याचबरोबर ट्रायने सुद्धा एक नवीन अॅप सुरु केला आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या फोनवर येणा-या चुकीच्या फोनची तक्रार करु शकता.
हेदेखील वाचा – लाँच झाला जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन, पाहा किती आहे ह्याची किंमत?
हेदेखील वाचा – भारतात लाँच होण्याआधीच सेलसाठी उपलब्ध झाला LeEco Le 2 स्मार्टफोन