BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स आणते. स्वस्तात मस्त बेनिफिट्स देणाऱ्या रिचार्ज प्लॅन्ससाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना कमी खर्चात बरेच फायदे मिळतात. यामध्ये डेटा, कॉलिंग, SMS टू OTT फायद्यांचा समावेश आहे. जर तुम्ही दीर्घकालीन वैधतेसह प्लॅन शोधत असाल, तर BSNL ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये अनेक उत्तम प्लॅन्स सादर केले आहेत.
आज आम्ही तुम्हाला BSNL कंपनीच्या 3 प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत, हे प्लॅन दीर्घकालीन वैधतेसह येतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त म्हणजेच 365 दिवसांची वैधता मिळते. चला तर मग जास्त वेळ न घालवता या प्लॅन्सची किंमत आणि लाभ जाणून घेऊयात.
हा प्लॅन तुम्हाला 395 दिवसांपर्यंत वैधता प्रदान करतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटाचा प्रवेश मिळतो. दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40Kbps पर्यंत कमी होतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत SMS देखील समाविष्ट आहेत.
हा प्लॅन 455 दिवसांपर्यंत वैधतेसह येतो. मात्र, लक्षात ठेवा हा जम्मू-काश्मीर विशेष प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. याशिवाय, दररोज 3GB डेटाचा प्रवेश मिळतो. दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40Kbps पर्यंत कमी होतो. हा प्लॅन 455 दिवसांसाठी एकूण 1,365GB डेटा आणि दररोज 3GB डेटा बेनिफिटसह येतो. यामध्ये यूजर्सना दररोज 100 फ्री SMS देखील मिळतात.
या प्लॅनमध्ये तुम्हाला 425 दिवसांपर्यंत वैधता मिळते. याशिवाय या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 मोफत SMS देखील समाविष्ट आहेत. हा प्लॅन EROS Now च्या स्वरूपात पूर्णपणे मोफत OTT सबस्क्रिप्शन देखील देतो. लक्षात घ्या की, कंपनीचा 2,398 रुपयांचा प्लॅन देखील फक्त जम्मू-काश्मीरमध्ये उपलब्ध आहे.