BSNL बद्दल बोलायचे तर हा देशातील एक मोठा वायर्ड नेटवर्क आहे, यापेक्षा जास्त वायर्ड नेटवर्क कोणत्याही इतर कंपनी कडे नाही.पण सध्या कंपनीची स्थिती चांगली नाही आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना नुकसान होत आहे. जरी इतर ठिकाणी कंपनीला जास्त फायदा होत नसला तरी एक सेगमेंट मध्ये कंपनीला खूप फायदा होत आहे.
तुम्हाला तर आधीपासूनच माहित आहे कि कंपनी ने आपल्या अनेक FTTH प्लान्स मधून डेली डेटा कॅप काढून टाकली आहे. पण याव्यतिरिक्त अनेक प्लान्स असे आहेत जे अनेक इतर ऑफर्स सह येत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मोठा डिस्काउंट पण मिळत आहे. विशेष म्हणजे या प्लान्स मध्ये तुम्हाला 100Mbps स्पीड सोबत 170GB पर्यंत डेली डेटा मिळत आहे, तसेच यासोबत तुम्हाला अमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन पण मिळत आहे. चला जाणून घेऊया या प्लान्स बद्दल.
या प्लान बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 500GB डेटा एका महिन्यासाठी 50Mbps च्या स्पीड सह मिळत आहे. पण हि डेटा लिमिट संपली की हा स्पीड कमी होऊन फक्त 2Mbps होईल. या प्लानचे मासिक रेंटल Rs 777 आहे. तसेच जर तुम्हाला याचा वार्षिक प्लान हवा असेल तर तुम्हाला हा Rs 7,770 मध्ये मिळणार आहे.
नावावरूनच समजले असेल कि या प्लान मध्ये तुम्हाला 750GB डेटा मिळत आहे, हा डेटा तुम्हाला 100Mbps स्पीड सह मिळत आहे, पण डेटा लिमिट संपल्यावर तुम्हाला हा स्पीड फक्त 2Mbps चा मिळणार आहे. तसेच या प्लानचे मासिक रेंटल Rs 1,277 आहे.
या प्लान बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 100Mbps च्या स्पीड सह 40GB डेटा मिळत आहे, तसेच डेटा लिमिट संपल्यावर तुम्हाला फक्त 2Mbps चा स्पीड मिळणार आहे. या प्लानचे रेंटल Rs 2,499 आहे.
असेच कंपनी कडे इतर अनेक प्लान पण आहेत, जसे कि तुम्हाला कंपनी कडे 50GB वाला प्लान पण मिळत आहे, तसेच 80GB वाल्या प्लान सह 120GB वाला प्लान पण मिळत आहे. त्याचबरोबर अजून एक प्लान पण कंपनी कडे आहे जो तुम्हाला 170GB डेटा सह मिळतो.