व्हॉट्सअपने पाठ फिरवल्यानंतर आता ब्लॅकबेरी BBM ला आणणार नव्या रुपात

Updated on 07-Mar-2016
HIGHLIGHTS

व्हॉट्सअपने पाठ फिरवल्यानंतर आता ग्राहकांनी केवळ ह्या कारणामुळे आपल्याकडे पाठ फिरवू नये, यासाठी ब्लॅकबेरीने आपल्या मेसेजिंग प्लेटफॉर्मला आणखी चांगले सोयीस्कर आणि मजेशीर बनविण्याासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे.

 

काही दिवसांपूर्वीच मोबाईल मेसेजिंग सर्विस व्हॉट्सअपने एक ब्लॉग जारी केला. ज्यात कंपनीने २०१६ च्या अखेरपर्यंत ब्लॅकबेरी ओएस (BB10) साठी आपला सपोर्ट देणे बंद करेल अशी घोषणा केली आहे. ही बातमी ब्लॅकबेरीच्या यूजर्ससाठी आश्चर्याचा धक्का देणारी आहे, जे आपल्या फोनवर व्हॉट्सचा वापर करतात.

 

मात्र व्हॉट्सअपने पाठ फिरवल्यानंतर आता ग्राहकांनी केवळ ह्या कारणामुळे आपल्याकडे पाठ फिरवू नये, यासाठी ब्लॅकबेरीने आपल्या मेसेजिंग प्लेटफॉर्मला आणखी चांगले सोयीस्कर आणि मजेशीर बनविण्याासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे.

 

व्हॉट्सअपचा ब्लॅकबेरीवर आपले सपोर्ट देणे बंद करण्याचा अर्थ आहे की पुढील वर्षापासून ब्लॅकबेरी ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे स्मार्टफोन्स यूजर्स आपल्या हँडसेटमध्ये व्हॉट्सअप वापरु शकणार नाही आणि ह्यामुळे यूजर्ससाठी ही चिंताजनक बातमी आहे, त्यामुळे ह्यावर तोडगा म्हणून ब्लॅकबेरीने आपला मेसेजिंग प्लेटफॉर्म अजून गंमतीशीर आणि सोपे बनविण्यावर काम सुरु केले आहे.

ब्लॅकबेरीने असे सांगितले आहे की, “ते ब्लॅकबेरी १० ऑपरेटिंग सिस्टम वर गुंतवणूक करणे सुरु ठेवणार असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ह्यात काही किज समाविष्ट किंवा अपडेट करणार आहोत.  तसेच व्हॉट्सअपचा सपोर्ट संपायच्या आत ह्या वर्षाअखेरीस व्हॉट्सअप मेसेंजरला पर्याय म्हणून BBOS आणि ब्लॅकबेरी 10 सक्रियरित्या वाढविणार आहोत.”

तसेच आम्ही ह्यात अनेक ग्रुप्स आणि अनेक लोकांचे चॅट्स विकसित करणार आहोत. असेही त्यांनी सांगितले. तसेच आम्ही जास्तीत जास्त चांगली खाजगी सुरक्षा देणार आहोत, त्याचबरोबर BBM ला अजून सोपे आणि मजेशीर बनविणार असल्याचे ब्लॅकबेरीने सांगितले.

हेदेखील वाचा – गार्मिन इंडियाने ‘विवोस्मार्ट HR’ एक्टिविटी ट्रॅकर केला लाँच

हेदेखील वाचा – शाओमी Mi ब्लूटुथ स्पीकर: केवळ १,९९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे हे उत्कृष्ट स्पीकर

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :