जसे की आपल्या सर्वांना माहितच असेल की, ब्लॅकबेरीच्या पहिल्या अॅनड्रॉईड स्मार्टफोन प्रिव खूपच चर्चेत होता. एवढेच नाही तर, हा स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालेल की नाही, याबाबत ही सर्वांच्या मनात शंका होती. मात्र कंपनीने ह्या स्मार्टफोनच्या जोरावर स्मार्टफोनच्या बाजारात पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं आणि ह्याच्या यशानंतर आता कंपनी आणखी स्वस्त अॅनड्रॉईड स्मार्टफोन्सला बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ह्या स्वस्त अॅनड्रॉईड स्मार्टफोन्सला बाजारात २०१६ मध्ये आणले जाईल.
प्रीव कंपनीचा पहिला अॅनड्रॉईड स्मार्टफोन आहे आणि लोकांनी ह्याला अगदी मोठ्या प्रमाणात भरघोस प्रतिसाद दिला. कंपनीचे म्हणणे आहे की, येणा-या काही दिवसात ह्याला ३१ देशांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. कंपनीचे आता हेच लक्ष्य आहे. कंपनीने म्हणणे आहे की प्रीवला मिळालेले भरघोस यश अॅनड्रॉईड स्मार्टफोन्सला घेऊन भविष्यात निर्णय घेईल. आणि त्याचबरोबर ह्याला घेऊन आणखी योजना बनवली जाईल.
प्रीव एक अॅनड्रॉईड स्मार्टफोन आहे, जो कंपनीकडून अॅनड्रॉईड ओएससह लाँच केला गेलेला पहिला स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 5.4 इंच QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1440×2560 पिक्सेल आहे. ह्यात 1.44GHz क्वालकॉम हेक्साकोर स्नॅपड्रॅगन 808 चिपसेट दिला गेला आहे. हा 3GB ची रॅम आणि 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
ह्यात १८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम लॉलीपॉप 5.1.1 वर चालतो. हा स्मार्टफोन 3410mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.