अखेर भारतात लाँच झाला ब्लॅकबेरीचा पहिला अॅनड्रॉईड स्मार्टफोन प्रीव
हा 3GB ची रॅम आणि 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो. त्याचबरोबर ह्यात ड्यूल फ्लॅशसह १८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
मोबाईल निर्माता कंपनी ब्लॅकबेरीने भारतात आपला पहिला अॅनड्रॉईड स्मार्टफोन प्रीव सादर केला. कंपनीने भारतात ह्याची किंमत ६२,९९० रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला ३० जानेवारीपासून मिळणे सुरु होईल.
कंपनीचा दावा आहे की, प्रीवमध्ये एक मोठी कर्व्ह्ड स्क्रीन दिली आहे, जो अॅनड्रॉईड अॅप, गुगल प्ले स्टोरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये सेक्युरिटी आणि प्रोडक्टिव्हिटीला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्याचबरोबर ब्लॅकबेरी प्रीव स्मार्टफोन आपल्याला हे सांगेल की, आपल्या डेटाला केव्हा सेक्युरिटी रिस्क आहे, ज्यामुळे आपण आपला डेटा सेव्ह करुन ठेवाल. प्रीव खूपच स्लिम आणि फिजिकल स्लायडर की-बोर्डवाला स्मार्टफोन आहे.
जर ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.4 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1440×2560 पिक्सेल आहे. ह्यात 1.44GHz क्वालकॉम-हेक्साकोर स्नॅपड्रॅगन 808 चिपसेटसह दिला गेला आहे. हा 3GB रॅम आणि 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
ह्यात 18 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम लॉलीपॉप 5.1.1 वर चालतो. हा स्मार्टफोन 3410mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.
हेदेखील वाचा- पुर्ण मेटल बॉडीसह समोर आला नोकियाचा नवीन स्मार्टफोन
हेदेखील पाहा- हे १० अॅप्स तरुण पिढीच्या फोनमध्ये असलेच पाहिजे