भारतात २८ जानेवारीला लाँच होणार ब्लॅकबेरीचा पहिला अॅनड्रॉईड प्रीव

भारतात २८ जानेवारीला लाँच होणार ब्लॅकबेरीचा पहिला अॅनड्रॉईड प्रीव
HIGHLIGHTS

ब्लॅकबेरी आपला पहिला अॅनड्रॉईड स्मार्टफोन प्रीव भारतात २८ जानेवारीला लाँच करणार आहे. ह्या स्मार्टफोनला भारताबाहेर अनेक देशांत लाँच केले गेले आहे.

ब्लॅकबेरीने भारतात आपला पहिला अॅनड्रॉईड स्मार्टफोन प्रिव लाँच करण्यासाठी निमंत्रण पाठवणे सुरु केले आहे. ह्या स्मार्टफोनला २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता नवी दिल्लीत एका आयोजित केलेल्या कार्यक्रमात लाँच केले जाईल.

 

अमेरिकेत ह्या फोनची किंमत 699 डॉलर (जवळपास ४७,३०० रुपये) पासून सुरु होईल, आणि हा कोणत्याही कॉन्ट्रॅक्टशिवाय विकला जाईल. अमेरिकेत ह्या फोनची डिलिवरी ६ नोव्हेंबरपासून सुरु झाली होती. तर कॅनडामध्ये 899 डॉलरमध्ये हा फोन विकला जात आहे.

कंपनीचा दावा आहे की, प्रीवमध्ये एक मोठी कर्व्ह्ड स्क्रीन दिली आहे, जो अॅनड्रॉईड अॅप, गुगल प्ले स्टोरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये सेक्युरिटी आणि प्रोडक्टिव्हिटीला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्याचबरोबर ब्लॅकबेरी प्रीव स्मार्टफोन आपल्याला हे सांगेल की, आपल्या डेटाला केव्हा सेक्युरिटी रिस्क आहे, ज्यामुळे आपण आपला डेटा सेव्ह करुन ठेवाल. प्रीव खूपच स्लिम आणि फिजिकल स्लायडर की-बोर्डवाला स्मार्टफोन आहे.

जर ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.4 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1440×2560 पिक्सेल आहे. ह्यात 1.44GHz क्वालकॉम-हेक्साकोर स्नॅपड्रॅगन 808 चिपसेटसह दिला गेला आहे. हा 3GB रॅम आणि 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.

ह्यात 18 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम लॉलीपॉप 5.1.1 वर चालतो. हा स्मार्टफोन 3410mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo