ह्यात 1.44GHz क्वालकॉम हेक्साकोर स्नॅपड्रॅगन 808 चिपसेट दिला गेला आहे. हा 3GB रॅम आणि 32GBच्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
मोबाईल निर्माता कंपनी ब्लॅकबेरीने आपला पहिला अॅनड्रॉईड स्मार्टफोन प्रीव लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ब्लॅकबेरीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. अमेरिकेमध्ये ह्या फोनची किंमत 699 डॉलर (जवळपास ४५,००० रुपये) पासून सुुरु होईल जो कोणत्याही कराराशिवाय विकेल. अमेरिकेत ह्या फोनची डिलिव्हरी ६ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे, तर कॅनडामध्ये ८९९ डॉलरमध्ये फोनची विक्री होईल.
कंपनीचा दावा आहे की, प्रीवमध्ये मोठी वक्र स्क्रीन दिली आहे, जी अॅनड्रॉईड अॅप, गुगल प्ले स्टोरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये सेक्यूरिटी आणि प्रोडक्टिव्हिटीसह आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्याचबरोबर ब्लॅकबेरी प्रीव स्मार्टफोन आपल्याला हे सांगेल की, कधी आपल्या डेटाला सेक्युरिटी धोका आहे, जेणेकरून आपण आपला डेटा वाचवू शकतो. प्रीव खूपच स्लिम आणि फिजिकल स्लायडर कीबोर्ड असलेला स्मार्टफोन आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.४ इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1440×2560 पिक्सेल आहे. ह्यात 1.44GHz क्वालकॉम हेक्साकोर स्नॅपड्रॅगन 808 चिपसेट दिला गेला आहे. ह्यात 3GBची रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.
ह्यात १८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम लॉलीपॉप 5.1.1 वर चालतो. हा स्मार्टफोन 3410mAh ची बॅटरी दिली गेली आहे.