BlackBerry KEY2 स्मार्टफोन 7 जूनला न्यू यॉर्क मध्ये सादर करण्यात आला होता आणि आता नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्यासाठी पण तयार आहे असे वाटते. भारतात Blackberry Keyone च्या किंमतीत कपाती नंतर वाटते आहे की नवीन KEY2 स्मार्टफोन लवकरच भारतात सादर केला जाऊ शकतो. Blackberry Keyone स्मार्टफोन मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये भारतात 39,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आता डिवाइस च्या किंमतीत 6,024 रूपयांची कपात झाली आहे ज्यामुळे या डिवाइस ची किंमत 33,975 रूपये झाली आहे. हा स्मार्टफोन नवीन किंमती सह अमेजॉन इंडिया वर लिस्टेड आहे जिथे कॅशबॅक ऑफर्स आणि EMI चा पर्याय पण उपलब्ध आहे.
आधीच्या डिवाइस च्या ग्लोबल लॉन्च नंतर काही दिवसांनी हा डिवाइस भारतात लॉन्च करण्यात आला होता, त्यामुळे अशा आहे की BlackBerry KEY2 पण लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.
BlackBerry KEY2 च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत $649 (जवळपास Rs. 43,700) आहे. डिवाइस चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट पण सादर करण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगन 660 SoC असलेला BlackBerry स्मार्टफोन प्रीमियम मिड-रेंज फ्लॅगशिप जसे की OnePlus 6 इत्यादी ला टक्कर देईल ज्यात स्नॅपड्रॅगन 845 SoC आहे.
BlackBerry KEY2 मध्ये 4.5 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 1620 x 1080 पिक्सल आहे आणि या डिस्प्ले चा एस्पेक्ट रेश्यो 3:2 आहे. स्मार्टफोन मध्ये फिजिकल कीबोर्ड आहे आणि KEYone प्रमाणे यात तिन कपॅसिटी टच बटन आहेत.
डिवाइस ची स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड ने 256GB पर्यंत वाढवता येते. डिवाइस मध्ये स्पेस बार वर एक फिंगरप्रिंट सेंसर एम्बेडेड आहे. डिवाइस मध्ये 3500mAh ची बॅटरी आहे आणि हा क्वालकॉम क्विक चार्ज 3.0 ला सपोर्ट करतो. डिवाइस मध्ये 3.5mm चा हेडफोन जॅक पण आहे.
ऑप्टिक्स बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस च्या रियर पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यातील एक 12MP चा प्राइमरी सेंसर आहे आणि हा f/1.8 अपर्चर सह येतो. तर एक 12MP चा सेकेंडरी सेंसर पण आहे जो f/2.6 अपर्चर सह येतो. कॅमेरा सेटअप ने 30fps वर 4K विडियो शूट करता येतील. स्मार्टफोन मध्ये एक 8MP चा सेल्फी कॅमेरा पण देण्यात आला आहे ज्या सोबत डिस्प्ले फ्लॅश पण आहे आणि हा 1080p विडियो रिकॉर्डिंग ला सपोर्ट करतो.