स्नॅपड्रॅगन 660 SoC सह 7 जूनला लॉन्च होईल Blackberry KEY2 स्मार्टफोन

स्नॅपड्रॅगन 660 SoC सह 7 जूनला लॉन्च होईल Blackberry KEY2 स्मार्टफोन
HIGHLIGHTS

कंपनी ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर फोटो पोस्ट करून ही माहिती शेयर केली ज्यात लिहले आहे “ एन आइकॉन रिबोर्न.”

Blackberry आपला पुढील स्मार्टफोन Blackberry Key2 7 जूनला लॉन्च करेल. Key 2 डिवाइस मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या Blackberry KEYone ची जागा घेईल. कंपनी ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर फोटो पोस्ट करून ही माहिती शेयर केली ज्यात लिहले आहे “ एन आइकॉन रिबोर्न.” फोटो वरून KEY2 च्या लॉन्च ची तारीख (7 जून) ची माहिती मिळत आहे. डिवाइस ची घोषणा न्यू यॉर्क मध्ये सकाळी 10 वाजता (10 AM ET) करण्यात येईल. KEY2 ची ब्रांडिंग खुप अकर्षक पद्धतीने केली आहे, KEY2 ला कंपनी ने 2 या अंका सोबत सादर केले आहे पण आधीच्या KEYone मध्ये अंका ऐवजी वन हा शब्द वापरण्यात आला होता. 

डिजाइन 
अजून KEY2 च्या स्पेक्स बद्दल माहिती मिळाली नाही, पण डिवाइस आधीच्या KEYone च्या डिजाइन आणि आइकोनिक QWERTY कीबोर्ड सह येऊ शकतो. डिवाइस अजून ताकदवान बनवण्यासाठी स्नॅपड्रॅगन 660 आणि 6GB रॅम वर अपग्रेड केला जाऊ शकतो. त्याचबरोबर डिवाइस मध्ये डुअल कॅमेरा पण असू शकतो. 
Blackberry चा एक फोन चीनच्या रेगुलेटर वेबसाइट TENAA वर दिसला होता जो KEY2 असण्याची शक्यता आहे. TENAA लिस्टिंग वर आपण आगामी डिवाइस चे फोटो बघू शकतो. फोटो बघून सांगू शकतो की डिवाइस मध्ये फिजिकल कीबोर्ड असेल. स्मार्टफोन च्या रियर पॅनल वर हॉरिजॉन्टली डुअल कॅमेरा सेटअप असू शकतो ज्या सोबत एक LED फ्लॅश असेल. 

TENAA नुसार संभावित स्पेसिफिकेशन्स 
TENAA ने स्मार्टफोन चे संभावित स्पेसिफिकेशंस पण पोस्ट केले होते. डिवाइस मध्ये 4.5 इंचाचा डिस्प्ले असेल ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 3:2 असेल आणि याचे रेजोल्यूशन 1620 x 1080 पिक्सल असेल. 
त्याचबरोबर डिवाइस मध्ये ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट, 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असेल. तसेच डिवाइस ची स्टोरेज माइक्रो एस डी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते. 

हे स्पेसिफिकेशन्स असू शकतात यात 
कॅमेरा सेटअप पाहता डिवाइस च्या रियरला 12MP चा प्राइमरी सेंसर आणि 8MP चा सेकेंडरी सेंसर असेल. त्याचबरोबर असेही बोलले जात आहे की डिवाइस च्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा असेल. डिवाइस मध्ये 3,360mAh ची बॅटरी असेल आणि डिवाइस एंड्राइड 8.1 ओरियो सह लॉन्च होऊ शकतो. Blackberry KEY2 ची किंमत आणि उपलब्धता याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही पण लॉन्च जवळ येता येता डिवाइस ची इतर माहिती समोर येऊ शकते. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo