Blackberry Key2 च्या टीजर विडियो वरून काही फीचर्स चा झाला खुलासा

Blackberry Key2 च्या टीजर विडियो वरून काही फीचर्स चा झाला खुलासा
HIGHLIGHTS

हा एक छोटा विडियो टीजर आहे पण यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की या डिवाइस मध्ये काय मिळणार आहे.

Blackberry ने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता कि कंपनी 7 जूनला आपला नवीन Key2 स्मार्टफोन लॉन्च करेल हा डिवाइस न्यू यॉर्क शहरात आयोजित इवेंट मध्ये लॉन्च होईल. आता कंपनी ने एक नवीन विडियो टीजर सादर केला आहे ज्यात डिवाइस च्या काही फीचर्स बद्दल माहिती मिळाली आहे. 
हा एक छोटा विडियो टीजर आहे पण यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की या डिवाइस मध्ये काय मिळणार आहे. टीजर मध्ये पॉवर बटन आणि वॉल्यूम रॉकर व्यतिरिक्त अजुन एक बटन आहे ज्याच्या वापराबद्दल अजूनतरी कोणती माहिती मिळाली नाही. नवीन बटन एका प्रकारचा अॅप ड्रॉवर शॉर्टकट वाटतो. याव्यतिरिक्त विडियो मध्ये Key2 मधील डुअल रियर कॅमेरा सेटअप चा पण खुलासा झाला आहे जो हॉरिजॉन्टली प्लेस आहे. कॅमेरा सोबत एक डुअल टोन LED फ्लॅश पण आहे.  Key2 पण मागील KeyOne प्रमाणे कीबोर्ड सह येतो पण या डिवाइस मध्ये काही छोटे-मोठे बदल करण्यात आले आहेत यातील नवीन बटन काही नवीन फंक्शन घेऊन येत आहे. 
Blackberry KEY2 एक मिड-रेंज मॉडेल आहे यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर, 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असू शकते. या डिवाइस ला आधीच TENAA, WFA आणि Bluetooth SIG आणि US FCC द्वारा सर्टिफिकेशन मिळाले आहे आणि TENAA वरून डिवाइस चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. 
रिपोर्ट नुसार, डिवाइस मध्ये 4.5 इंचाचा डिस्प्ले असेल ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 3:2 असेल आणि याचे रेजोल्यूशन 1620 x 1080 पिक्सल असेल. त्याचबरोबर डिवाइस मध्ये ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट, 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असेल. तसेच डिवाइस ची स्टोरेज माइक्रो एस डी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते. त्याचबरोबर डिवाइस मध्ये डुअल कॅमेरा, 3.5mm ऑडियो जॅक आणि टाइप-C पोर्ट आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo