जसे बोलले जात होते त्यानुसार ब्लॅकबेरी ने आपला Blackberry KEY2 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा डिवाइस न्यूयॉर्क मधील एका इवेंट मध्ये सादर करण्यात आला आहे. हा डिवाइस ड्यूल कॅमेरा तसेच एका QWERTY कीबोर्ड सह लॉन्च करण्यात आला आहे, याचा अर्थ असा की या डिवाइस मध्ये डिस्प्ले सोबत कंपनी ची ओळख असलेला कीबोर्ड पण आहे. पण फक्त हा कीबोर्ड नाही, या डिवाइस मध्ये अजून खुप काही आहे.
या डिवाइस बद्दल बोलायचे झाले तर कंपनी ने आधीच्या डिवाइस KEYOne मध्ये जास्त बदल करून हा नवीन डिवाइस लॉन्च करण्यात आला नाही. पण या नवीन डिवाइस मध्ये थोडेफार बदल करण्यात आले आहेत. हा डिवाइस सीरीज-7 च्या एल्युमीनियम पासून बनवण्यात आला आहे. त्यामुळे हा आधीच्या डिवाइस पेक्षा खुप हल्का झाला आहे.
या डिवाइस च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस एका 4.5-इंचाच्या 1620×1080 पिक्सल च्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, जो 3:2 आस्पेक्ट रेश्यो सह येतो. याव्यतिरिक्त यात तुम्हाला एक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट देण्यात आला आहे, तसेच यात एक 6GB चा रॅम पण आहे. फोन मध्ये एक 3,500mAh क्षमता असलेली बॅटरी असणार आहे, जी क्विक चार्ज 3.0 टेक्निक सह लॉन्च करण्यात आली आहे. त्याचबरोबर या डिवाइस मध्ये तुम्हाला हा फीचर पण मिळत आहे की तुमची बॅटरी कुठे वापरली जात आहे.
फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला, जो एक 12-मेगापिक्सल चा कॅमेरा कॉम्बो आहे. ड्यूल कॅमेरा सह तुम्हाला पोर्ट्रेट मोड पण मिळत आहे, त्याचबरोबर तुम्हाला 2X झूम पण मिळत आहे. फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा कॅमेरा आहे. फोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो.
फोन ची किंमत आणि याची उपलब्धता बद्दल बोलायचे तर या डिवाइस ची शिपिंग या महिन्यात कधीही सुरू होऊ शकते, याची किंमत 649 डॉलर म्हणजे जवळपास Rs 43,500 आहे, ही किंमत US मध्ये याच्या 64GB वर्जन ची आहे, तसेच याचाड्यूल सिम 128GB वेरिएंट लवकरच येईल. तुम्ही डिवाइस ब्लॅक आणि सिल्वर रंगात घेऊ शकता.