BlackBerry आपल्या Key2 स्मार्टफोन ला 7 जूनला सादर करणार आहे. या डिवाइस ला आधीच TENAA, WFA आणि Bluetooth SIG कडून सर्टिफिकेशन मिळाले आहेत आणि आता डिवाइस ला US FCC कडून पण अप्रूवल मिळाले आहे.
TENAA वरून मिळाली माहिती
TENAA ने स्मार्टफोन चे संभावित स्पेसिफिकेशंस पण पोस्ट केले होते. डिवाइस मध्ये 4.5 इंचाचा डिस्प्ले असेल ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 3:2 असेल आणि याचे रेजोल्यूशन 1620 x 1080 पिक्सल असेल. त्याचबरोबर डिवाइस मध्ये ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट, 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असेल. तसेच डिवाइस ची स्टोरेज माइक्रो एस डी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते. तसेच डिवाइस मध्ये डुअल कॅमेरा, 3.5mm ऑडियो जॅक आणि टाइप-C पोर्ट आहे.
अजून KEY2 च्या स्पेक्स बद्दल माहिती मिळाली नाही, पण डिवाइस आधीच्या KEYone च्या डिजाइन आणि आइकोनिक QWERTY कीबोर्ड सह येऊ शकतो. डिवाइस अजून ताकदवान बनवण्यासाठी स्नॅपड्रॅगन 660 आणि 6GB रॅम वर अपग्रेड केला जाऊ शकतो.
Blackberry चा एक फोन चीनच्या रेगुलेटर वेबसाइट TENAA वर दिसला होता जो KEY2 असण्याची शक्यता आहे. TENAA लिस्टिंग वर आपण आगामी डिवाइस चे फोटो बघू शकतो. फोटो बघून सांगू शकतो की डिवाइस मध्ये फिजिकल कीबोर्ड असेल. स्मार्टफोन च्या रियर पॅनल वर हॉरिजॉन्टली डुअल कॅमेरा सेटअप असू शकतो ज्या सोबत एक LED फ्लॅश असेल.
हे स्पेसिफिकेशन्स असू शकतात यात
कॅमेरा सेटअप पाहता डिवाइस च्या रियरला 12MP चा प्राइमरी सेंसर आणि 8MP चा सेकेंडरी सेंसर असेल. त्याचबरोबर असेही बोलले जात आहे की डिवाइस च्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा असेल. डिवाइस मध्ये 3,360mAh ची बॅटरी असेल आणि डिवाइस एंड्राइड 8.1 ओरियो सह लॉन्च होऊ शकतो. Blackberry KEY2 ची किंमत आणि उपलब्धता याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही पण लॉन्च जवळ येता येता डिवाइस ची इतर माहिती समोर येऊ शकते.