Amazon वर सेल साठी उपलब्ध झाला नवीन BlackBerry KEY2 स्मार्टफोन

Updated on 31-Jul-2018
HIGHLIGHTS

या स्मार्टफोन ची किंमत 42,990 रुपये आहे आणि हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 Kryo 260 ओक्टा कोर प्रोसेसर सह येतो.

BlackBerry KEY2 स्मार्टफोन कंपनी ने काही दिवसांपूर्वी लॉन्च केला आहे आणि आज पासून हा डिवाइस भारतात सेल साठी उपलब्ध झाला आहे, हा स्मार्टफोन फक्त अमेजॉन वर सेल साठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन कंपनी ने 42,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. त्याचबरोबर अमेजॉन वर ICICI बँक क्रेडिट कार्ड EMI वर 5% चा इंस्टेंट डिस्काउंट पण मिळत आहे. 

BlackBerry KEY2 मध्ये 4.5 इंचाचा टच डिस्प्ले देण्यात आला आहे आणि सोबत QWERTY कीबोर्ड पण आहे. कंपनी ने फिंगरप्रिंट स्कॅनर स्पेस बार मध्ये एम्बेड केला आहे. यात एक FHD IPS LCD डिस्प्ले आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो (433 PPI ) 3:2 आहे. डिवाइस मध्ये 3500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलजी सोबत येते आणि डिवाइस ला 40 मिनिटांमध्ये 50% चार्ज करू शकते. 

स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 Kryo 260 ओक्टा कोर प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे आणि यात 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. त्याचबरोबर डिवाइस ची स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते. 

BlackBerry KEY2 लेटेस्ट एंड्राइड 8.1 ओरियो वर लॉन्च करण्यात आला आहे ज्यामुळे यूजर्स गूगल प्ले स्टोर्स आणि अॅप्स वापरू शकतील. डिवाइस मध्ये BlackBerry हब पण आहे, कंपनी म्हणते की हा एक यूनीफाइड मेसेजिंग अॅप आहे जो सर्व ईमेल्स, टेक्स्ट, सोशल मीडिया जसे की व्हाट्सॅप इत्यादी वरील सर्व मेसेजेस एका जागी दाखवतो. BlackBerry हब चा अजून एक फायदा म्हणजे या मधून तुम्ही मल्टीपल ईमेल अकाउंट्स वापरू शकता आणि तुम्हाला अॅप्स स्विच पण करावे लागणार नाहीत. तुम्ही एकाच जागी जीमेल, याहू मेल, आउटलुक, माइक्रोसॉफ्ट आणि इतर मेल प्रोवाइडर्स चे अकाउंट्स वापरू शकता. 

ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर BlackBerry KEY2 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला त्यामूळे हा डिवाइस कंपनी चा पहिला डुअल कॅमेरा डिवाइस बनला आहे. हे दोन्ही कॅमेरा 12 मेगापिक्सल चे सेंसर्स आहेत जे हाई आणि लो दोन्ही लाइट कंडीशंस मध्ये उत्तम फोटो घेतात. त्याचबरोबर हा ऑटो फोकस आणि इम्प्रूव्ड इमेज स्टेबिलाइजेशन सह येतो. डिवाइस च्या फ्रंट ला सेल्फी साठी 8 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी चे म्हणेन आहे की नवीन पोर्ट्रेट मोड आणि ऑप्टिकल सुपरझूम मुळे रात्री पण चांगले फोटो काढता येतील. BlackBerry KEY2 मध्ये गूगल लेंस पण देण्यात आली आहे. 

कनेक्टिविटी साठी डिवाइस मध्ये ब्लूटूथ 5.0 LE, टाइप-C USB 3.0, USB, OTG, NFC, FM रेडियो ला सपोर्ट करतो आणि फिंगरप्रिंट सेंसर सोबत डिवाइस मध्ये एक्सलेरोमीटर, मॅग्नेटोमीटर, गायरोस्कोप, प्रोक्सिमिटी, एम्बिएंट लाइट, हॉल इफेक्ट सेंसर्स पण आहेत. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :