BlackBerry चा पहिला डुअल कॅमेरा स्मार्टफोन BlackBerry KEY2 42,990 रुपयांमध्ये झाला भारतात लॉन्च
हा डिवाइस भारतातच बनवण्यात आला आहे आणि 31 जुलै पासून अमेजॉन डॉट इन वर सेल साठी उपलब्ध होईल.
BlackBerry first dual camera smartphone BlackBerry KEY2 launched in India, cost Rs 42,990: भारतात BlackBerry चे ब्रांड लाइसेंस असलेल्या Optiemus Infracom ने आज BlackBerry KEY2 स्मार्टफोन लॉन्च केला आहे, हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात न्यूयॉर्क मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि हा डिवाइस आधीच्या BlackBerry KEYone ची जागा घेईल. हा कीबोर्ड बेस्ड स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 Kryo 260 ओक्टा कोर प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे आणि यात 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. त्याचबरोबर डिवाइस ची स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते.
BlackBerry KEY2 मध्ये 4.5 इंचाचा टच डिस्प्ले देण्यात आला आहे आणि सोबत QWERTY कीबोर्ड पण आहे. कंपनी ने फिंगरप्रिंट स्कॅनर स्पेस बार मध्ये एम्बेड केला आहे. हा एक FHD IPS LCD डिस्प्ले आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो (433 PPI ) 3:2 आहे. डिवाइस मध्ये 3500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलजी सोबत येते आणि डिवाइस ला 40 मिनिटांमध्ये 50% चार्ज करू शकते. हा मेड इन इंडिया डिवाइस आहे आणि 31 जुलै पासून अमेजॉन डॉट इन वर सेल साठी उपलब्ध होईल.
BlackBerry KEY2 लेटेस्ट एंड्राइड 8.1 ओरियो वर लॉन्च करण्यात आला आहे ज्यामुळे यूजर्स गूगल प्ले स्टोर्स आणि अॅप्स वापरू शकतील. डिवाइस मध्ये BlackBerry हब पण आहे, कंपनी म्हणते की हा एक यूनीफाइड मेसेजिंग अॅप आहे जो सर्व ईमेल्स, टेक्स्ट, सोशल मीडिया जसे की व्हाट्सॅप इत्यादी वरील सर्व मेसेजेस एका जागी दाखवतो. BlackBerry हब चा अजून एक फायदा म्हणजे या मधून तुम्ही मल्टीपल ईमेल अकाउंट्स वापरू शकता आणि तुम्हाला अॅप्स स्विच पण करावे लागणार नाहीत. तुम्ही एकाच जागी जीमेल, याहू मेल, आउटलुक, माइक्रोसॉफ्ट आणि इतर मेल प्रोवाइडर्स चे अकाउंट्स वापरू शकता.
ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर BlackBerry KEY2 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला त्यामूळे हा डिवाइस कंपनी चा पहिला डुअल कॅमेरा डिवाइस बनला आहे. हे दोन्ही कॅमेरा 12 मेगापिक्सल चे सेंसर्स आहेत जे हाई आणि लो दोन्ही लाइट कंडीशंस मध्ये उत्तम फोटो घेतात. त्याचबरोबर हा जलद ऑटो फोकस आणि इम्प्रूव्ड इमेज स्टेबिलाइजेशन सह येतो. डिवाइस च्या फ्रंट ला सेल्फी साठी 8 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी चे म्हणेन आहे की नवीन पोर्ट्रेट मोड आणि ऑप्टिकल सुपरझूम मुळे रात्री पण चांगले फोटो घेता येतील. BlackBerry KEY2 मध्ये गूगल लेंस पण देण्यात आली आहे.
कनेक्टिविटी साठी डिवाइस ब्लूटूथ 5.0 LE, टाइप-C USB 3.0, USB, OTG, NFC, FM रेडियो ला सपोर्ट करतो आणि फिंगरप्रिंट सेंसर सोबत डिवाइस मध्ये एक्सलेरोमीटर, मॅग्नेटोमीटर, गायरोस्कोप, प्रोक्सिमिटी, एम्बिएंट लाइट, हॉल इफेक्ट सेंसर्स पण आहेत.
BlackBerry KEY2 भारतात 42,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि हा डिवाइस 31 जुलै पासून जुलै पासून अमेजॉन डॉट इन वर सेल साठी उपलब्ध होईल. तसेच डिवाइस सोबत रिलायंस जियो ची 4,450 रूपयांची कॅशबॅक ऑफर पण मिळत आहे आणि ICICI बँक ने ऑफर मध्ये 5% कॅशबॅक दिला आहे.