मोबाईल निर्माता कंपनी ब्लॅकबेरीने हल्लीच आपला नवीन अॅनड्रॉईड स्मार्टफोन प्रिव लाँच केला आहे. सध्यातरी हा स्मार्टफोन युएस,युके आणि कॅनडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. आता कंपनीने आपल्या अॅनड्रॉईड अॅप्लिकेशनला सुद्धा गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध केले आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉगवर ह्याबाबत माहिती दिली आहे. ब्लॅकबेरीने गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध झालेल्या सर्व अॅप्लिकेशनची यादी दिली आहे.
सध्यातरी ह्या यादीत एकूण ७ अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. कंपनी ह्यासोबतच ब्लॉगवर अशी माहिती दिली आहे की, ब्लॅकबेरी प्रिव आता काही दिवसच दूर आहे. जर तुम्ही ब्लॅकबेरीला जवळून ओळखत असाल तर तुम्हाला माहितच असेल की, ब्लॅकबेरी कीबोर्ड, एक्सफँट आणि ब्लॅकबेरी लाँचरसारखे अॅप्लिकेशन आता गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध झाले आहेत.
हा स्मार्टफोन युनायटेड किंग्डम आणि कॅनडामध्ये क्रमश: ५५९ ग्रेट ब्रिटेन पाउंड(जवळपास ५५,७००) आणि ८९९ कॅनडा डॉलर(जवळपास ४४,५०० रुपये) मध्ये मिळेल. हा स्मार्टफोन आउट ऑफ बॉक्स अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर चालतो. ह्यात फिजिकल कीबोर्डसुद्धा जो डिस्प्ले खाली दिला आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ब्लॅकबेरी प्रिवमध्ये ५.४ इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1440×2560 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन हेक्सा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसर, ३जीबी आणि ३२ जीबी अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्यात मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट, ब्लूटुथ ४.१, NFC, मायक्रो USB पोर्ट आणि १८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये ३४१०mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीनुसार सामान्य़ वापरावर हा २२.५ तास चालतो. ब्लॅकबेरी प्रिवमध्ये 4G LTE, 3G, वायफाय आणि इतर कनेक्टिव्हिटीची वैशिष्ट्ये दिली गेली आहेत.