BLACK SHARK 2 PRO SD 855 PLUS सह 30 जुलैला होईल लॉन्च
SD 855 Plus असेल यात
स्नॅपड्रॅगॉन 855 Plus सह येणार पहिला फोन आहे Asus ROG Phone 2
चीन मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर पोस्ट केल्या गेलेल्या विडियो वरून समजले आहे कि Black Shark 2 Pro स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 Plus SoC द्वारा संचालित केला जाईल. अनेक दिवसांपासून असे अंदाज लावले जात होते कि आगामी Black Shark गेमिंग फोन लेटेस्ट स्नॅपड्रॅगॉन चिपसेट सह सादर केला जाईल. Snapdragon 855 Plus स्नॅपड्रॅगॉन 855 SoC चा अपग्रेड आहे आणि हा 15 टक्के चांगली ग्राफिक्स परफॉरमेंस देतो. Shark 2 Pro मागील Black Shark 2 फोनची जागा घेण्यासाठी सादर केला जाईल. Black Shark 2 अलीकडेच भारतात लॉन्च केला गेला आहे.
Weibo वर आलेल्या टीजर मध्ये Black Shark 2 Pro दाखवण्यात आला नाही. पण असे समजले आहे कि स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 855 Plus चिपसेट सह येईल जो क्वालकॉमने या महिन्याच्या सुरवातीला सादर केला आहे.
स्टॅंडर्ड स्नॅपड्रॅगॉन 855 SoC च्या तुलनेत स्नॅपड्रॅगॉन 855 Plus SoC ग्राफिक्स परफॉरमेंसच्या बाबतीत 15 टक्के चांगला परफॉर्म करतो. चिप Kryo 485 CPU सह पेयर केली गेली आहे जी 2.96GHz वर क्लोक्ड आहे आणि मागच्या जनरेशनच्या SoC च्या तुलनेत थोडी चांगली प्रोसेसिंग पॉवर डिलीवर करतो.
Black Shark 2 Pro ब्लॅक शार्क ऑनलाइन स्टोर वर पण दिसला आहे ज्यात DC Dimming 2.0 आणि लिक्विड कूलिंग 3.0+ चा पण खुलासा झाला आहे.
अलीकडेच AnTuTu लिस्टिंग वरून समजले होते कि Black Shark 2 Pro मध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिली जाईल. नवीन गेमिंग स्मार्टफोन नुकताच ऑनलाइन दिसला होता ज्यावरून समजले होते कि डिवाइस मागच्या Black Shark 2 सारख्या बॅक पॅनल सह येईल.
Black Shark 2 Pro चीन मध्ये 30 जुलैला लॉन्च केला जाईल आणि फोनची टक्कर Asus ROG Phone 2 अशी होईल जो काही दिवसांपूर्वी लॉन्च झाला आहे आणि स्नॅपड्रॅगॉन 855 Plus SoC सह येणार हा पहिला फोन आहे.
फीचर्ड इमेज Black Shark 2 ची आहे.