TRUEVIEW डिस्प्ले सह गेमिंग फोन BLACK SHARK 2 PRO लॉन्च, अशी आहे किंमत

TRUEVIEW डिस्प्ले सह गेमिंग फोन BLACK SHARK 2 PRO लॉन्च, अशी आहे किंमत

दीर्घ प्रतीक्षेनंतर Black Shark 2 Pro कंपनीने चीन मध्ये लॉन्च केला आहे. फोन RMB 2,999 म्हणजे जवळपास 29,900 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात तुम्हाला 12GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट मिळतो. या फोनची खासियत अशी आहे कि हा असा जगातील दुसरा स्मार्टफोन आहे जो Qualcomm च्या लेटेस्ट फ्लॅगशिप SoC Snapdragon 855 Plus सह येतो. 

Black Shark चा हा लेटेस्ट स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे जो नेक्स्ट-जनरेशन Liquid Cooling सिस्टम, हाई रिफ्रैश रेट वाला TrueView डिस्प्ले आणि सोबत 12GB पर्यंतच्या रॅम सह येतो. Black Shark 2 Pro फोन सोबत तुम्हाला काही गेमिंग एसेसरीज पण मिळतात. हा फोन Asus ROG Phone 2 ला टक्कर देऊ शकतो जो याच प्रोसेसर सह लॉन्च केला गेला होता. 

स्मार्टफोन सोबत कंपनीने गेमिंग हेडसेट पण लॉन्च केले आहेत, ज्यात in-ear आणि over-the-ear टाइप हेडफोन्सचा समावेश आहे. कंपनीचा असा दावा आहे कि डिवाइस ने AnTuTu मध्ये 500,610 स्कोर मिळवला आहे, जो जगातील सर्वात जास्त AnTuTu स्कोर आहे. 

XIAOMI BLACK SHARK 2 PRO PRICE

Black Shark 2 Pro चीन मध्ये बेस किंमत RMB 2,999 म्हणजे जवळपास 29,900 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 12GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट मिळतो. तसेच याचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरीएंट RMB 3,499 म्हणजे जवळपास 34,900 रुपयांमध्ये मिळतो. चीन मध्ये 2 ऑगस्ट पासून सेल साठी हा डिवाइस उपलब्ध केला जाईल. 

 

BLACK SHARK 2 PRO SPECIFICATIONS

Black Shark 2 Pro फोन मध्ये तुम्हाला 6.39-इंचाचा AMOLED डिस्प्ले रिजॉल्यूशन 1080 x 2340 pixels सह मिळतो. यात तुम्हाला DC Dimming सपोर्ट सह 240Hz ची स्क्रीन स्क्रीन देण्यात आली आहे. हा गेमिंग डिवाइस 4,000mAh बॅटरी सह येतो, जो Quick Charge 4.0 सपोर्ट सह येतो. स्मार्टफोन Snapdragon 855 Plus प्रोसेसर 2.96GHz च्या क्लॉक स्पीड सह येतो. 

स्मार्टफोन मध्ये 12GB रॅम सह 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन पण आहे. यात Android 9 Pie बेस्ड MIUI 10 OS चा समावेश आहे. यात कंपनीने Black Space Dock 4.0 नावाचा गेमिंग मोड पण दिला आहे. ऑप्टिक्स अंतर्गत याच्या मागील ड्यूल कॅमेरा सेटअप मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आणि 13-मेगापिक्सलचा सेकंड्री कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. 

सेल्फी साठी यात 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटी साठी स्मार्टफोन मध्ये Dual-band Wi-Fi, Bluetooth 5.0, 4G LTE, dual-SIM slots, USB Type-C, आणि GLONASS सह A-GPS चा समावेश आहे. 

 

 

 

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo