Best Gaming Smartphones under 20000: तुम्ही सुद्धा 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत एक उत्तम गेमिंग स्मार्टफोन शोधत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. सध्या भारतीय बाजारात अनेक उत्तम गेमिंग स्मार्टफोन उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 20,000 रुपयांच्या आत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 20,000 रुपयांअंतर्गत गेमिंग स्मार्टफोनसाठी, Motorola, Samsung, iQOO, Nothing आणि Redmi सारखे ब्रँड उत्तम पर्याय सादर करतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 20,000 रुपयांअंतर्गत टॉप 5 गेमिंग फोन्सबद्दल माहिती देणार आहोत.
Also Read: प्रतीक्षा संपली! अखेर Redmi Note 14 सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेक्स
Moto Edge 50 Neo स्मार्टफोन प्रसिद्ध इ कॉमर्स साईट Flipkart वर 21,999 रुपयांना उपलब्ध आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, उत्तम परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimension 7300 चिपसेटच्या सपोर्टसह येते. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. या सेटअपमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 10MP टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 4310mAh बॅटरी आहे, जी 68W टर्बो चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
20,000 रुपयांच्या बजेटमध्ये Samsung Galaxy A15 5G देखील गेमिंग स्मार्टफोन्समध्ये एक उत्तम पर्याय आहे. या स्मार्टफोनची किंमत Amazon वर 14,998 रुपये इतकी आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी, 50MP मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे.
Nothing 2a स्मार्टफोन Flipkart वर 23,999 रुपयांना उपलब्ध असेल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन MediaTek Dimensity 7200 Pro चिपसेटद्वारे सुसज्ज आहे. या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. त्याबरोबरच, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. तर, फोटोग्राफीसाठी यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS सह दोन 50MP कॅमेरे मिळतील. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO चा iQOO Z9 फोन Amazon वर 18,498 रुपयांना खरेदी करता येईल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन MediaTek Dimensity 7200 चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX882 OIS कॅमेरा समाविष्ट आहे. जो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, सुपर नाईट मोड, 2x पोर्ट्रेट झूम आणि व्हिडिओंसाठी 50MP UHD मोडला सपोर्ट करतो. तर, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.
प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर Redmi Note 13 Pro ची किंमत 18,250 रुपये इतकी आहे. Redmi Note 13 Pro फोनमध्ये 1.5K 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी, या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस बसवण्यात आला आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 7s Gen 2 चिपसेटसह येतो. फोटोग्राफीसाठी, यात 200MP प्राइमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर, त्याच्या फ्रंटमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. तर, स्मार्टफोनमध्ये IR ब्लास्टर देखील उपलब्ध आहे.