दिवाळीला नवीन फोन खरेदी करायचंय? 20,000 रुपयांच्या आत सर्वोत्तम 5G स्मार्टफोन, टॉप 5 बेस्ट डिल्स

दिवाळीला नवीन फोन खरेदी करायचंय? 20,000 रुपयांच्या आत सर्वोत्तम 5G स्मार्टफोन, टॉप 5 बेस्ट डिल्स
HIGHLIGHTS

या दिवाळीला तुमचे फोन 5G स्मार्टफोनमध्ये बदला.

20,000 रुपयांच्या आत सर्वोत्तम 5G स्मार्टफोन

बघा Samsung, Oneplus इ.चे बजेटमधील सर्वोत्तम फोन्स

भारतात 5G इंटरनेट सेवा सुरू झाली असून मोठ्या शहरांतील ग्राहकांना त्याचा लाभ मिळणे, सुरु झाले आहे. जर तुमच्याकडे 4G स्मार्टफोन असेल, तर तुम्ही ते अपग्रेड केल्याशिवाय नवीन 5G टेक्नॉलॉजी आणि हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ घेऊ शकणार नाही. तुम्ही या दिवाळीला तुमचा फोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पुढील काही उत्तम पर्याय बघू शकता. आम्ही तुमच्यासाठी 20,000 रुपयांखालील सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोनची यादी तयार केली आहे.

हे सुद्धा वाचा : SAMSUNG ची अप्रतिम कॉम्बो डील ! 'हा' फोन खरेदी केल्यास 3 हजारमध्ये मिळेल 32 हजारांचे स्मार्टवॉच

OnePlus Nord CE 2 Lite

OnePlus Nord सीरिजच्या या डिव्हाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.59-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. यात Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसरसह 8GB पर्यंत रॅम आहे. मागील पॅनलवर 64 + 2 + 2MP ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 5,000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत 19,999 रुपयांपासून सुरू होते. येथून खरेदी करा… 

Oppo K10

Oppo K10 स्मार्टफोन Flipkart वरून 16,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंच लांबीचा डिस्प्ले आहे आणि तो MediaTek Dimensity 810 5G चिपसेटद्वारे समर्थित आहे. 48 + 2MP ड्युअल कॅमेरा व्यतिरिक्त, यात 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनची 5,000mAh बॅटरी 33W सुपर VOOC चार्जिंगद्वारे समर्थित आहे. येथून खरेदी करा… 

Samsung Galaxy M33 5G

सॅमसंगच्या M-सिरीजच्या या 5G फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंचाचा डिस्प्ले आहे. Exynos 1280 प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंगसह 6,000mAh बॅटरी आहे. 50MP क्वाड रियर कॅमेरा असलेला हा फोन 16,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. येथून खरेदी करा… 

Poco X4 Pro 5G

या Poco डिव्हाइसमध्ये गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शनसह 6.67-इंच लांबीचा 120Hz डिस्प्ले आहे. हे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज स्पेससह Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. मागील पॅनलवर 64 + 8 + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 16MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन फ्लिपकार्टवर 16,999 रुपयांपासून खरेदी केला जाऊ शकतो. येथून खरेदी करा… 

Realme 9 Pro

या डिव्हाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसरसह 6.6-इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे. मागील पॅनलवर 64 + 8 + 2MP ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. 16MP फ्रंट कॅमेरा असलेल्या फोनची 5,000mAh बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याची किंमत 18,999 रुपयांपासून सुरू होते. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo