Best Smartphones under 45000: जर तुम्ही देखील नवीन आणि प्रीमियम स्मार्टफोन्स खरेदी करण्यास इच्छुक असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी पॉवरफुल फीचर्ससह सुसज्ज 45,000 रुपयांच्या अंतर्गत येणाऱ्या फोन्सबद्दल माहिती देणार आहोत. या फोन्समध्ये तुम्हाला कर्व डिस्प्ले, हाय रिफ्रेश रेट, पॉवरफुल प्रोसेसर यासह अनेक खास फिचर्स उपलब्ध आहेत. पहा यादी-
Also Read: लेटेस्ट Moto G35 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी
iQOO 11 5G मध्ये Amazon वर 44,999 रुपयांना खरेदी करता येईल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, 144Hz सह 2K रिझोल्यूशन AMOLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर देखील आहे. जो खूप चांगला परफॉर्मन्स देतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP कॅमेरा देखील आहे. हा फोन 8K रिझोल्युशन पर्यंत रेकॉर्ड करू शकतो. यात 5000 mAH बॅटरी आहे जी 120W फास्टसह काही मिनिटांत चार्ज होऊ शकते.
Vivo V30 Pro 5G हा फोन Amazon वर 41999 रुपयांना उपलब्ध आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये तुम्हाला 6.78 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले मिळेल. तर, उत्तम परफॉर्मन्ससाठी तुम्हाला Mediatek Dimensity 8200 5G प्रोसेसर मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये तुम्हाला 5000mAH बॅटरी आहे, जी 80W चार्जरने खूप लवकर चार्ज करता येईल. या फोनमध्ये तुम्हाला 3 50MP कॅमेरे मिळतील, ज्यासह उत्तम फोटोग्राफी करता येईल.
Motorola razr 40 हा फोन तुम्हाला Amazon वर 44999 रुपयांना मिळेल. हा एक फोल्डेबल स्मार्टफोन आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर मिळणार आहे. फोनमधील स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.9 इंच लांबीचा 144Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 64MP मुख्य कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाइड कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, यात 4200 mAH बॅटरी आहे, जी 30W च्या चार्जिंग स्पीडला सपोर्ट करेल.