Best Smartphones Under 20000: डिसेंबर 2024 संपायला आता केवळ 25 दिवसांचा अवधी उरला आहे. हा वर्ष स्मार्टफोन्स जगतात अगदी महत्त्वाचा ठरला आहे. या वर्षी अनेक निरनिराळ्या स्मार्टफोन्स तंत्रज्ञानाचा उदय झाला आहे. फोन्समध्ये नव्या डिझाईनसह नवे वैशिट्येदेखील या वर्षी पाहायला मिळाले. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 20,000 रुपयांअंतर्गत या वर्षी लाँच झालेले टॉप 5 स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत. यामध्ये Xiaomi, Realme, Samsung सारख्या सुप्रसिद्ध ब्रँड्सचे फोन्स समाविष्ट आहेत. पहा यादी-
Also Read: Best Smartphones Under 25000: 2024 मध्ये किफायतशीर किमतीत लाँच झालेले टॉप 5 फोन्स, पहा यादी
Infinix Note 40 Pro 5G ची किंमत 18,699 रुपये इतकी आहे. फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा फुल-HD + कर्व AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील वापरण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimension 7020 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 108MP चा प्राथमिक कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा सेन्सर आहे. तर, फोनच्या फ्रंटमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
Realme Narzo 70 Pro ची किंमत 18,999 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 6.67-इंच लांबीची AMOLED स्क्रीन, 120Hz रीफ्रेश रेट आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP सोनी IMX890 नाईट व्हिजन कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स, 2MP मॅक्रो लेन्स आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. तर पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. Realme फोन्समध्ये यंदा रेनवॉटर टच आणि एअर जेश्चर सारखे फीचर्सदेखील सामील झाले आहेत.
iQOO Z9 ची किंमत 18,699 रुपये इतकी आहे. iQOO Z9 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1800 nits पीक ब्राइटनेस आणि DT-Star2 Plus ग्लास संरक्षणासह 6.67-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 7200 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला 50MP+2MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी हा फोन 16MP फ्रंट कॅमेरासह येतो. फोनला पॉवर देण्यासाठी या हँडसेटमध्ये 5000mAh बॅटरी आहे.
Xiaomi Redmi Note 13 Pro ची किंमत 18,000+ रुपये इतकी आहे. तुम्ही हा फोन इ-कॉमर्स साईटवरून खरेदी करू शकता. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा AMOLED पॅनेल, 120Hz रिफ्रेश रेट, कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस प्रोटेक्शन उपलब्ध आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 सह सुसज्ज आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरासह सज्ज आहे. ज्यामध्ये 200MP+2MP+8MP चा रियर कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5100mAh ची बॅटरी देखील आहे.
Realme Narzo 70 Turbo ची किंमत 16,998 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा 120Hz OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 7300 Energy चिपसेटने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP AI कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी क्षमता 5000mAh आहे आणि ती 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन IP65 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट आहे. यात स्टेनलेस स्टील व्हीसी कुलिंग सिस्टम उपलब्ध आहे.