Best Smartphones For Vlogging: सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि त्यामध्ये कॅमेरा असल्यामुळे तरुणाईमध्ये Vlogging करण्याचे क्रेझ वाढले आहे. सोशल मीडियावर तर बरेच जण याद्वारे उत्तम इनकम आणि प्रसिद्धी मिळवतात. म्हणून आजकाल चांगल्या कॅमेरा फीचर्ससह येणाऱ्या फोन्सच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढतच चालला आहे. आज या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला उत्तम कॅमेरा फीचर्ससह स्वस्तात किमतीत येणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही भारी Vlogging करू शकता.
तुम्हाला Realme स्मार्टफोनमध्ये फोटो आणि व्हिडिओ शूटसाठी 108 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच, 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. तसेच, यात 5000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
तुम्हाला Poco X5 Pro 5G स्मार्टफोनमध्ये हाय-रिझोल्यूशनसह प्रायमरी कॅमेरा मिळतो. हा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे. तसेच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल. हा फोन फक्त 25,000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेल्या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. अधिकृत साइटवर फोनची सवलत किंमत 19,999 रुपये आहे. फोनमध्ये 4020mAh ची बॅटरी उपलब्ध आहे. यात 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम उपलब्ध आहे.
यात फोटो आणि व्हिडिओग्राफीसाठी 108MP प्रायमरी कॅमेरा आहे. OnePlus Nord CE 3 Lite 5G ची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आहे. तुम्हाला फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळेल. त्याबरोबरच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येईल.