Best Smartphones under 40000: आपणा सर्वांना माहितीच आहे की, तरुणाईला चांगल्या कॅमेरासह येणारे स्मार्टफोन्स आकर्षित करतात. कारण सध्या तरुणाईमध्ये व्लाॅगिंग करण्याचे क्रेझ वाढतच चालले आहे. यासाठी त्यांना अर्थातच चांगल्या कॅमेरासह येणारे स्मार्टफोन्स हवे असतात. हे स्मार्टफोन्स जरा महागड्या श्रेणीमध्ये येतात. तुमचे बजेट देखील या श्रेणीमध्ये असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला उत्तम कॅमेरासह येणाऱ्या आणि 40000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्स पर्याय सांगणार आहोत. पाहुयात यादी-
Also Read: 50MP मेन कॅमेरासह Vivo Y300 5G अखेर भारतात लाँच! किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी
Xiaomi 14 Civi स्मार्टफोनची किंमत 38,999 रुपये इतकी आहे. कंपनीने Snapdragon 8s Gen 3 मोबाइल प्लॅटफॉर्मसह Xiaomi 14 CIVI स्मार्टफोन आणला आहे. हा Xiaomi फोन 1.5K 6.55 इंच AMOLED स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. Xiaomi चा नवीन फोन 50MP लाइट फ्यूजन 800 इमेज सेन्सरसह येतो. याशिवाय, फोन 50MP Coca-Cola 50mm टेलिफोटो कॅमेरा, 12MP कोका-कोला अल्ट्रा-वाइड कॅमेरासह सुसज्ज आहे. त्याबरोबरच, हा फोन 32MP प्राथमिक सेल्फी कॅमेरा आणि 32MP अल्ट्रावाइड या दोन सेल्फी कॅमेरासह येतो.
Samsung Galaxy A55 5G स्मार्टफोनची किंमत 31,800 रुपये इतकी आहे. या सॅमसंग फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आणि रिफ्रेश दर 120Hz आहे. हे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ संरक्षणासह येते. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे, त्यासोबत, 12MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 5MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, फोनच्या फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
Vivo T3 Ultra स्मार्टफोनची किंमत 31,999 रुपये इतकी आहे. Vivo T3 Ultra च्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये OIS आणि f/1.88 अपर्चरसह 50MP Sony IMX 921 प्राथमिक कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. या सेटअपमध्ये स्मार्ट ऑरा लाइट आहे, जे नाईट फोटोग्राफीमध्ये मदत करेल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये f/2.0 अपर्चर, ऑटोफोकस आणि AI फेशियल कलरिंग तंत्रज्ञानासह 50MP ग्रुप सेल्फी कॅमेरा आहे.
iQOO Neo 9 Pro स्मार्टफोनची किंमत 35,999 रुपये इतकी आहे. कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन iQOO Neo 9 Pro ड्युअल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 50MP IMX 920 नाईट व्हिजन कॅमेरा लेन्स बसवण्यात आला आहे. यासोबत 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स सपोर्ट उपलब्ध आहे. कॅमेरामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्ट देखील आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा लेन्स आहे.